इन्सुली -कोंडवाडा येथील माळरानावर भीषण आग
01:14 PM Feb 25, 2026 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement
आगीत तिलारी कालव्यासाठी ठेवलेले पाईप जळून खाक ; प्रशासनाला कळवूनही अग्निशमन बंब नाही दाखल
Advertisement
बांदा । प्रतिनिधी
सावंतवाडी तालुक्यातील इन्सुली -कोंडवाडा येथील माळरानावर बुधवारी दुपारी लागलेल्या भीषण आगीत तिलारी कालव्यासाठी ठेवलेले पाईप जळून खाक झाले. आग एवढी भीषण होती की जवळपास 50 एकर जागेला आगीने वेढले. लागलेल्या आगीत माळरानावरील शेतमांगराचे छप्पर जळून खाक झाले. स्थानिकांनी अग्निशमन बंबासाठी प्रशासनाशी संपर्क साधूनही बंब दाखल न झाल्याने पंचायत समिती सदस्य सदाशिव राणे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
Advertisement
Advertisement