For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Kolhapur News : वाठार मध्ये गॅरेजला भीषण आग ; दोन लाख रुपयांचे नुकसान

05:00 PM Feb 05, 2026 IST | NEETA POTDAR
kolhapur news   वाठार मध्ये गॅरेजला भीषण आग   दोन लाख रुपयांचे नुकसान
Advertisement

                            गायकवाड बिल्डिंग समोरील दोन दुकाने भस्मसात

Advertisement

अंबप : वाठार ता हातकणंगले येथे सीता वाईन्स शेजारी असणाऱ्या गायकवाड बिल्डिंग समोरील बाबा टू व्हीलर गॅरेज व राजू जेन्टस पार्लर ही दोन दुकाने आगीमध्ये भस्मसात झाली. घटना स्थळावरून मिळालेली सविस्तर माहिती अशी की सदरची दोन्ही दुकान गाळे सुरेश यशवंत गायकवाड यांच्या मालकीची असून त्या एका गाळ्यात विजय तुकाराम शिर्के रा वाठार यांनी बाबा गॅरेज नावाने टू व्हीलर दुरुस्तीचे काम करतात तर शेजारचा जेन्टस पार्लरला भाड्याने दिला होता.

आज सकाळी 8 30 च्या सुमारास सुरेश गायकवाड यांनी गाळ्यालगत पडलेला कचरा व ऑईल मध्ये खराब झालेली कापडे एकत्र करून जाळत असताना ऑईलच्या कापडामुळे आग गॅरेजमध्ये शिरली बघेपर्यंत आगीने रौद्र रूप धारण केले तर आतमध्ये असणारी सुरेश गायकवाड यांच्या मालकीची दुचाकी दुरुस्तीसाठी काल दिली होती ती जळून खाक झाली तर ऑईल डब्बे, इतर साहित्य जळून खाक झालं. 

Advertisement

यामध्ये एक दुचाकी, इतर साहित्य, ऑईल कॅन, इतर गाड्याचे स्पेअर स्पार्ट असे मिळून दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे तर जेन्टस पार्लर मधील सर्व फर्निचर व इतर साहित्य जळून खाक झाले असून फक्त पत्रेच शिल्लक राहिले आहेत घटनेची माहिती मिळताच जनसेवक पत्रकार प्रकाश कांबळे यांनी घटनेच्या ठिकाणी धाव घेऊन आग विझवण्यास सुरुवात केली यावेळी विजय शिर्के, अथर्व शिर्के दत्तात्रय शिर्के, गणेश कुंभार,दादासो दबडे, योगेश दबडे, गणेश क्षीरसागर, दत्ता कांबळे,अतुल देसाई यांनी मदत केली

Advertisement
Tags :

.