For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Amravati News | अमरावतीत जिल्हा रुग्णालयात भीषण आग; ३ नवजात बालकांचा दुर्दैवी मृत्यु

03:17 PM Aug 25, 2026 IST | NEETA POTDAR
amravati news   अमरावतीत जिल्हा रुग्णालयात भीषण आग  ३ नवजात बालकांचा दुर्दैवी मृत्यु
Advertisement

अमरावती -अमरावती जिल्हा स्त्री सामान्य रुग्णालयातील नवजात शिशु अतिदक्षता विभागाला सोमवारी पहाटे ३.३० च्या सुमारास भीषण आग लागली. दुर्घटनेत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू झाला, तर सहा बालकांना कर्मचाऱ्यांनी तातडीने बाहेर काढून पुढील उपचारांसाठी सुपर-स्पेशालिटी रुग्णालयात हलवले.

Advertisement

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच मृतांच्या कुटुंबियांना ५ लाखाची मदत व जखमी बालकांवर शासकीय खचनि उपचार करण्याचे
अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दुर्घटना निर्देश दिले आहेत.

आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली. दुर्घटनेच्या चौकशीसाठी आयुक्त संजय काटकर यांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यीय समिती नेमल्याचे त्यांनी सांगितले. प्राथमिक माहितीनुसार, व्हेंटिलेटरमध्ये स्फोट झाल्यानंतर आग लागल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आग लागल्यानंतर काही क्षणांतच कक्षात धूर पसरला. ड्युटीवर असलेल्या कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखत तातडीने बचावकार्य सुरू केले.

Advertisement

Advertisement
Tags :

.