मंगळूरमध्ये ऑरोमाझेन परफ्यूम कारखान्याला भीषण आग
10:04 AM Sep 11, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
बेंगळूर : मंगळूर जिल्ह्यातील बैकंपाडी औद्योगिक वसाहतीत ऑरोमाझेन सुगंधी द्रव्य निर्मिती (परफ्यूम) कारखान्याला बुधवारी पहाटे भीषण आग लागली. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, कारखान्यातील साहित्याचे मोठे नुकसान झाले. बुधवारी पहाटे 5 च्या सुमारास ऑरोमाझेन परफ्यूम कारखान्याला अचानक आग लागली. आगीची माहिती मिळताच एमसीएफ, एनएमपीए आणि कद्री येथील अग्नीशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. आग आटोक्यात आणण्यात अग्नीशमन जवानांना यश आले. मात्र, कारखान्यातील सुगंधी द्रव्य, स्पीरिट व यंत्रसामग्री आगीत भस्मसात झाली. आगीचे कारण अद्याप उलगडलेले नाही. पणंबूर पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे.
Advertisement
Advertisement