For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ट्रान्सफॉर्मर गोदामाला रायपूरमध्ये भीषण आग

06:44 AM Apr 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
ट्रान्सफॉर्मर गोदामाला रायपूरमध्ये भीषण आग
Advertisement

25,000 लिटर तेलाच्या टाकीचा स्फोट : 1,500 ट्रान्सफॉर्मर जळून खाक

Advertisement

वृत्तसंस्था/ रायपूर

छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये ट्रान्सफॉर्मर गोदामामध्ये अचानक मोठा स्फोट होऊन भीषण आग लागली. या आगीत गोदामात ठेवलेले 1,500 ट्रान्सफॉर्मर जळून खाक झाले. शहरातील गुढियारी पोलीस स्टेशन हद्दीतील भारत माता चौकाजवळील विद्युत विभागाच्या उपविभाग कार्यालयाच्या गोदामात ही दुर्घटना घडल्याची माहिती देण्यात आली.

Advertisement

25,000 लिटर तेलाच्या टाकीचा स्फोट झाल्यानंतर काहीवेळातच आगीने मोठे रूप धारण केल्याने आकाशात दूरवर धुराचे लोट दिसत होते. आग वाढत असल्याचे पाहून परिसरातील नागरिकांनी अग्निशमन दल आणि पोलिसांना घटनेची माहिती दिली. विद्युत विभागाच्या कार्यालयाला आग लागल्याने आजूबाजूच्या परिसरात एकच गोंधळ उडाला. भीषण आगीमुळे आजूबाजूच्या परिसरात राहणाऱ्या लोकांना घरे रिकामी करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. घटनास्थळी पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत. गोदामात सुमारे 6 हजार ट्रान्सफॉर्मर ठेवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या आग विझविण्यासाठी दाखल झाल्या. वीज विभागाच्या उपविभागीय कार्यालयाला आग लागल्याने वीजपुरवठा पूर्णपणे खंडित झाला आहे. विभागाच्या कार्यालयाला आग लागल्याची माहिती मिळताच सर्व वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले. ट्रान्सफॉर्मरमधील शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचे सांगण्यात येत आहे.

Advertisement
Tags :

.