Kolhapur : आजरा तालुक्यात मासेवाडी येथे भीषण आग; गवत गंजी जळून खाक
01:05 PM Jan 05, 2026 IST | NEETA POTDAR
Advertisement
आजरा तालुक्यात आगीचा कहर;
Advertisement
आजरा : मासेवाडी येथे रविवारी दुपारी लागलेल्या आगीत गवत गंज्या जळून खाक झाल्या. त्यामुळे भादवण, खोराटवाडी व मासेवाडी येथील शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. भुतोबा देवालय परिसरात रविवारी दुपारी अचानक आग लागली. धुराचे लोळ पाहून शेतकऱ्यांनी शेताच्या दिशेनेधाव घेतली.
मात्र भर दुपारी लागलेली आग सर्वत्र पसरल्याने आग आटोक्यात आणणे शेतकऱ्यांना शक्य झाले नाही. या आगीत पारुबाई कोलते, निवृत्ती पाटील, महादेव कोलते, सुगंधा कोलते, अनुसया कोलते, मधुकर कोलते, रावसाहेब कोलते, शिवाजी कोलते, श्रीकांत देसाई, विजय खोराटे, दत्तात्रय खोराटे आदी शेतकऱ्यांच्या गवत गंजी जळून खाक झाल्या.
Advertisement
Advertisement