For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रशियात गॅस प्रकल्पात भीषण आग, 7 जण ठार

06:40 AM Aug 27, 2026 IST | Tarun Bharat Portal
रशियात गॅस प्रकल्पात भीषण आग  7 जण ठार
Advertisement

मृतांमध्ये 6 चिनी नागरिक : 9 जण बेपत्ता

Advertisement

वृत्तसंस्था, मॉस्को

रशियाच्या दुर्गम पूर्व अमूर भागात एका गॅस केमिकल कॉम्प्लेक्समध्ये भीषण आग लागली आहे. या दुर्घटनेत 6 चिनी नागरिकांसमवेत 7 जणांचा मृत्यू झाला. तर 9 जण बेपत्ता झाले आहेत. तर प्रकल्पात लागलेली आग विझविण्यात आल्याचे  सांगण्यात आले आहे.

Advertisement

या दुर्घटनेत 152 जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार जारी आहेत. यातील 36 जणांना रुग्णालयात हलविण्यात आले आहे. रशियाच्या चौकशी समितीने या घटनेची चौकशी सुरू केली आहे. औद्योगिक सुरक्षा नियमांच्या उल्लंघनामुळे ही दुर्घटना घडल्याचे मानले जात आहे. तर समिती आग लागण्याच्या कारणांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहे.

रशियाच्या या गॅस प्रकल्पाच्या निर्मितीकार्यात विदेशी कर्मचाऱ्यांची मदत घेण्यात आली होती, ज्यात चीनचे अनेक नागरिक सामील होते. रशिया नेहमीच मोठ्या औद्योगिक अन् पायाभूत प्रकल्पांसाठी विदेशी कर्मचाऱ्यांची मदत घेत असतो.

अमूर गॅस केमिकल कॉम्प्लेक्स पॉलिइथिलिन आणि पॉलिप्रोपाइलीन तयार करणाऱ्या जगातील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक आहे. या प्रकल्पातून दरवर्षी सुमारे 23 लाख मेट्रिक टन पॉलिइथिलीन आणि 4 लाख टन पॉलिप्रोपाइलिनचे उत्पादन होते. हा प्रकल्प रशियाच्या दुर्गम पूर्व अमूर भागात सिबूर आणि सिनोपेकच्या सहकार्याने विकसित करण्यात येत आहे.

Advertisement
Tags :

.