For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सीरियाच्या राजधानीतील कॅफेमध्ये भीषण स्फोट, 9 ठार

06:22 AM Jul 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
सीरियाच्या राजधानीतील  कॅफेमध्ये भीषण स्फोट  9 ठार
Advertisement

दमास्कस : सीरियाची राजधानी दमास्कसमध्ये एका कॅफेत झालेल्या स्फोटात कमीतकमी 9 जणांचा मृत्यू झाला आहे. मुख्य कोर्ट हाउस नजीक झालेल्या या स्फोटात 20 जण जखमी झाले आहेत. सध्या कुठल्याही गटाने या स्फोटाची जबाबदारी स्वीकारलेली नाही.

Advertisement

ज्या उपकरणाद्वारे हा स्फोट घडवून आणला गेला, ते जुन्या प्रकारचे असावे. गृह मंत्रालय लवकरच स्वत:च्या प्रारंभिक चौकशीचे निष्कर्ष जाहीर करणार आहे. या स्फोटात हात असलेल्या गुन्हेगारांना शिक्षा केली जाईल, असे उद्गार दमास्कसचे गव्हर्नर माहेर इदलिबी यांनी काढले. सीरियात सत्ता सांभाळणाऱ्या अल-शरा यांचे सरकार राजधानी आणि त्याच्या आसपासच्या भागांमध्ये हल्ले रोखण्याचा प्रयत्न करत असताना ही घटना घडली. डिसेंबर 2024 मध्ये असद शासनला सत्तेवरून घालवत अल-शरा यांनी दमास्कस आणि आसपासच्या भागांमध्ये इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेच्या विरोधात कठोर कारवाई केली आहे.

अल-शरा सरकारने देशाच्या बहुतांश हिस्स्यांवर पुन्हा नियंत्रण मिळविले आहे, परंतु स्थिरता आणण्याच्या प्रयत्नांदरम्यान त्यांना सुरक्षा आव्हानांना तोंड द्यावे लागत आहे.

Advertisement

Advertisement

.