For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Satara Breaking | तासवडे एमआयडीसीतील केमिकल कंपनीत भीषण स्फोट, परिसरात भीतीचे वातावरण

10:44 AM Mar 30, 2026 IST | NEETA POTDAR
satara breaking   तासवडे एमआयडीसीतील केमिकल कंपनीत भीषण स्फोट  परिसरात भीतीचे वातावरण
Advertisement

             केमिकल बॅलर्स फुटल्याने तासवडे एमआयडीसी हादरले

Advertisement

सातारा -तासवडे एमआयडीसी येथे सोमवारी (30 मार्च 2026) सकाळी सुमारे साडे आठ वाजण्याच्या सुमारास एका केमिकल कंपनीत भीषण स्फोट झाला. स्फोटानंतर जवळपास दहा वाजेपर्यंत कंपनी परिसरात अधूनमधून स्फोट होत असल्याची माहिती मिळाली आहे.

ही घटना SKS Fine Chem या कंपनीत, प्लॉट क्रमांक B-1 (47) येथे घडली. प्राथमिक माहितीनुसार, “एम्ब्रोजिल बेस” नावाच्या केमिकलचे बॅरल्स फुटल्यामुळे मोठ्या प्रमाणावर आग लागली आणि धुराचे लोट संपूर्ण एमआयडीसी परिसरात पसरले, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

Advertisement

सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नसल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

घटनास्थळी पोलीस आणि अग्निशामक दलाचे बंब तात्काळ दाखल झाले असून, आग विझवण्याचे आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.

Advertisement
Tags :

.