For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

इराणच्या बंदरात भीषण स्फोट

06:58 AM Feb 01, 2026 IST | Tarun Bharat Portal
इराणच्या बंदरात भीषण स्फोट
Advertisement

अनेकजण ठार झाल्याची भीती, इमारती धाराशायी, कारण अद्याप अस्पष्ट, दहशतवादी हल्ल्याचा संशय

Advertisement

वृत्तसंस्था / तेहरान (इराण)

इराणमधील सर्वात महत्वाचे आणि गजबजलेले बंदर ‘बंदर अब्बास’ मध्ये प्रचंड स्फोट झाला आहे. या स्फोटात बंदराच्या परिसरात असलेल्या अनेक इमारती धाराशायी झाल्या आहेत. अनेक लोकांचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून हा दहशतवादी हल्ला असल्याचा संशय अनेकांनी व्यक्त केलेला आहे.

Advertisement

या बंदरातील एका निवासी इमारतीत हा स्फोट शनिवारी झाला. ही इमारत 8 मजली आहे. या इमारतीचे दोन मजले पूर्णत: नष्ट झाले असून इमारत या स्फोटामुळे मोडकळीला आलेली आहे. स्फोटाच्या दणक्याने परिसरातील इतर इमारतींनाही तडे गेले असून अनेक इमारती कोसळल्या आहेत. आजूबाजूची वाहने नष्ट झाली असून दुकानांचीही जबर हानी झाल्याची माहिती देण्यात येत आहे.

भिंती कोसळल्या

या स्फोटाचा दणका एवढा मोठा होता, की बंदरावरील एका इमारतीच्या बाहेरील भिंती कोसळल्या आहेत. या इमारतीच्या आतला भाग दृष्टीस पडेल इतकी हानी झाली आहे. ही इमारत राहण्यास निरुपयोगी झाली आहे. या स्फोटाचे आणि त्यामुळे झालेल्या हानीचे व्हिडीओ चित्रण प्रसिद्ध करण्यात आले असून त्यावरुन या स्फोटाची तीव्रता किती होती, हे दिसून येते, असे तज्ञांचे मत आहे.

साहाय्यता कार्याचा प्रारंभ

स्फोटानंतर त्वरित बंदरावरील आणि बाहेरुन आलेल्या साहाय्यता पथकांनी त्यांच्या कार्याला प्रारंभ केला. जखमींना आधी रुग्णालयात नेण्यात आले. नंतर इमारतीखाली अडकेल्यांची सुटका करण्याचा प्रयत्न करण्यात आला. इराणच्या प्रशासनाने या स्फोटाची माहिती जगातील इतर देशांना कळविण्यात आली आहे, असे प्रशासनाने प्रतिपादन पेले. हा स्फोट दहशतवाद्यांनी घडवून आणला आहे काय याचे उत्तर तपासानंतर मिळणार आहे. दहशतवादी हल्ल्याची शक्यता गृहित धरुन तपास केला जाईल, असे इराणच्या सेनाधिकाऱ्यांच्या प्रवत्क्याने स्पष्ट केले .

अद्याप नाही स्पष्ट महिती

इराणच्या प्रशासनाने या स्फोटाची अद्याप स्पष्ट माहिती दिलेली नाही. अनेक जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत, एवढीच अधिकृत महिती देण्यात आली आहे. तथापि, स्फोटाची तीव्रता पाहता अनेक लोकांचा  मृत्यू झाला असावा, अशी आशंका व्यक्त केली जात आहे. इराणचे प्रशासन काहीतरी लपवत आहे, असा आरोप इराणमधील पत्रकारांनीच शनिवागी केला.

अमेरिकेशी वादाची पार्श्वभूमी

इराणने आपला अणुकार्यक्रम मागे घेतला नाही, किंवा त्यासंबंधी अमेरिकेशी चर्चा केली नाही, तर इराणवर अमेरिका हल्ला करेल आणि हा हल्ला अत्यंत विनाशकारी आणि त्रीव असेल, असा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी काही दिवसांपूर्वी दिला आहे. तसेच अमेरिकेची एक मोठी विमानवाहू नौका आणि काही युद्धनौका आता इराणच्या आखाताच्या दिशेने वाटचाल करीत आहेत. त्यामुळे युद्धाचा धोका वाढला आहे. अशा परिस्थितीत हा स्फोट झाल्याने तो अधिक गंभीर आहे, असे मत व्यक्त केले जात आहे. इराणमध्ये काही दिवसांपूर्वी मोठे आणि देशव्यापी जनआंदोलन झाले होते. इराणच्या प्रशासनाने ते सैनिकी बळाचा उपयोग करुन दडपले होते. इराणच्या दडपशाहीत 6 हजारांहून अधिक आंदोलकांचा मृत्यू झाला आहे. ही संख्या अधिकृत असून प्रत्यक्षात यापेक्षा कितीतरी पट अधिक मृत्यू झाले आहेत, अशी अनधिकृत माहिती आहे. या आंदोलनाची पार्श्वभूमीही या स्फोटाला आहे. अद्याप कोणत्याही दहशतवादी गटाने या स्फोटाची जबाबदारी स्वीकारलेली नाही. तथापि, या घटनेमुळे इराणमध्ये पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे विदेशी पत्रकारांकडून स्पष्ट केले जात आहे.

अब्बास बंदराची मोठी हानी

ड या स्फोटाची भीषणता एखाद्या दहशतवादी हल्ल्यासारखीच असल्याचे स्पष्ट

ड इराण सरकारकडून अद्याप स्पष्ट माहिती नाही, त्यामुळे अनेक तर्कवितर्क

ड अब्बास बंदराची मोठी हानी, अनेक इमारती कोसळल्या, कामकाज रहीत

ड इराणमध्ये भीतीचे वातावरण, प्रशासनाकडून माहिती नसल्याने अफवांना ऊत

Advertisement
Tags :

.