For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दादरा-नगर हवेलीमध्ये गोदामात भीषण स्फोट

06:22 AM Apr 05, 2026 IST | Tarun Bharat Portal
दादरा नगर हवेलीमध्ये गोदामात भीषण स्फोट
Advertisement

चार ठार : अन्य 6 जण जखमी

Advertisement

वृत्तसंस्था/ सिल्वासा

दादरा आणि नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशातील सिल्वासा येथे नायट्रोजनच्या गोदामात मोठा स्फोट झाला. यात 4 जणांचा मृत्यू झाला असून 6 जण जखमी झाले आहेत. ही घटना देमानी स्कूल फालिया परिसरात घडली. शनिवारी सकाळी 9:30 च्या सुमारास झालेल्या या भीषण स्फोटामुळे परिसरात घबराट पसरली. स्फोट इतका शक्तिशाली होता की त्याचा आवाज दूरवर ऐकू आल्यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

Advertisement

स्फोटाची दुर्घटना घडलेले गोदाम एका वर्दळीच्या रस्त्यावरील गल्लीच्या जवळ आणि शाळेपासून अवघ्या 30 मीटर अंतरावर असल्यामुळे सुरक्षेबाबत गंभीर चिंता निर्माण झाली आहे. प्राथमिक माहितीनुसार, हे गोदाम परवानगीशिवाय चालवले जात होते. या दुर्घटनेतील एकूण सहा जखमींना सिल्वासा येथील नमो रुग्णालयात आणण्यात आले होते. तसेच उपचारापूर्वीच तिघांना मृत घोषित करण्यात आले. इतरांवर उपचार सुरू आहेत.

स्फोटाचे कारण अद्याप अस्पष्ट

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि 108 रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी बचावकार्य सुरू केले. खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण परिसर सील करण्यात आला होता. स्फोटाचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. सुरुवातीला, तांत्रिक बिघाड किंवा निष्काळजीपणाचा संशय आहे. प्रशासनाने याप्रकरणी सखोल चौकशी सुरू केली आहे.

नायट्रोजन गॅस सिलिंडर भरताना स्फोट?

मिळालेल्या माहितीनुसार, नायट्रोजन गॅस सिलिंडर भरत असताना त्याचा अचानक स्फोट झाला. स्फोट इतका शक्तिशाली होता की गोदामातील इमारतीचे काही ढिगारा रस्त्यावर विखुरला होता. तसेच परिसरात भूकंपासारखे धक्के जाणवल्याने घबराट पसरली. जवळच्या शाळेतील मुलेही घाबरली. या घटनेची निष्पक्ष चौकशी सुरू करण्यात आली आहे. सुरक्षा नियमांचे उल्लंघन झाले होते का, याची चौकशी केली जात आहे.

Advertisement
Tags :

.