For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कंग्राळी बुद्रुक लक्ष्मी यात्रेत भाविकांचा महापूर

11:44 AM May 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
कंग्राळी बुद्रुक लक्ष्मी यात्रेत भाविकांचा महापूर
Advertisement

आजपासून गोड प्रसादाचे वाटप : खासदार जगदीश शेट्टर यांनी घेतले लक्ष्मीदेवीचे दर्शन

Advertisement

वार्ताहर/कंग्राळी बुद्रुक

गावचे ग्रामदैवत श्री लक्ष्मीदेवीची यात्रा तब्बल 43 वर्षांनी 28 एप्रिलपासून मोठ्या धार्मिकेतेने सुरू झाली आहे. यात्रेला दररोज लाख ते दिड लाख भाविकांची दर्शनासाठी अलोट गर्दी होत असून यात्रेचा रविवार दिवस मांसाहार जेवणासाठीचा शेवटचा दिवस होता. उद्या सोमवारपासून गोड प्रसाद वाटपाला सुरुवात होणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. रविवारी सुट्टीचा दिवस असल्यामुळे देवीच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी झाली असून यात्रा कमिटीने दर्शनासाठी योग्य नियोजन केल्यामुळे भाविकांना दर्शन अगदी सुलभ मिळत होते. यामुळे योग्य नियोजनामुळे भाविकांतून समाधान व्यक्त करण्यात येत होते.

Advertisement

खासदार जगदीश शेट्टर यांनी घेतले श्री लक्ष्मीदेवीचे दर्शन

खासदार जगदीश शेट्टर यांनी रविवारी श्री लक्ष्मीदेवी यात्रेला धावती भेट देऊन श्रीलक्ष्मी देवीचे दर्शन घेतले. यावेळी देवस्थान पंचकमिटी, यात्रा कमिटी व ग्रामस्थांच्यावतीने खास जगदीश शेट्टर यांचे शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी जगदीश शेट्टर यांनी यात्रा कमिटीचे अभिदंन केले.

शाहूनगरवासीय भाविकांकडून श्री लक्ष्मीदेवीला साडी चोळी अर्पण

कंग्राळी बुद्रुक गावची यात्रा बेळगाव शहराबरोबर तालुका व जिल्ह्यामध्ये एक भव्य दिव्य यात्रा होत असून गावातील अनेक भाविकांकडून देवीला साडी चोळी अर्पण करून आशिर्वाद घेत असल्याचे चित्र दिसून येत आहे. रविवारी सायंकाळी समस्त शाहूनगरवासीय भाविकांकडून ढोल ताशांचा निणादात मिरवणुकीने येऊन गदगे ठिकाणी आरूढ श्री लक्ष्मीदेवीला साडीचोळी अर्पण करून श्री लक्ष्मीदेवीचा आशिर्वाद घेतला. कंग्राळी बुद्रुकची यात्रा तालुक्यामध्ये एक भव्य दिव्य यात्रा साजरी होणार अशी चर्चा दररोज होणाऱ्या बैठकेंतून होत होती. दररोज लाख दिड लाख भाविकांची उपस्थिती दर्शविणार अशी चर्चा यापूर्वीच  होती.

Advertisement
Tags :

.