For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ढगफुटीमुळे हिमाचलमध्ये प्रचंड हानी

07:00 AM Aug 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
ढगफुटीमुळे हिमाचलमध्ये प्रचंड हानी
Advertisement

कुल्लूसह चार जिल्ह्यांमध्ये भूस्खलनाच्या दुर्घटना : 50 हून अधिक बेपत्ता, 6 मृतदेह सापडले

Advertisement

वृत्तसंस्था /शिमला

हिमाचल प्रदेशात बुधवारी मध्यरात्री पावसाने मोठ्या प्रमाणात विध्वंस घडवून आणला आहे. ढगफुटीसदृश पावसानंतर आतापर्यंत अनेक घरे उद्ध्वस्त झाली आहेत. या घटनांमध्ये 50 हून अधिक लोक बेपत्ता आहेत. मदत व बचावकार्यादरम्यान 6 जणांचे मृतदेहही सापडले आहेत. एनडीआरएफसोबत एसडीआरएफ आणि आयटीबीपीचे जवान बचावकार्यात गुंतले आहेत. वाढत्या दुर्घटनांमुळे लोकांना सुरक्षित ठिकाणी आश्रय घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. राज्यातील चार जिह्यांमध्ये ढगफुटीच्या घटना घडल्या आहेत. राज्यातील कुल्लू, मंडी, शिमला आणि चंबा येथे ढगफुटीसदृश पावसाने दाणादाण उडविली. कुल्लू जिल्ह्यातील मलाणा नाल्यात मुसळधार पावसानंतर ढग फुटल्याने मलाणा वन आणि मलाणा दोन वीज प्रकल्पांचे मोठे नुकसान झाले आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये धरण फुटल्याचा दावाही करण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे पार्वती नदीच्या पाण्याची पातळी धोक्मयाच्या चिन्हावर गेली आहे. यासोबतच कुल्लू जिह्यातील सर्व नद्या दुथडी भरून वाहत आहेत.

Advertisement

कुल्लू जिह्यातील अनी येथील श्रीखंड महादेव मार्गावर असलेल्या कुरपण येथे ढगफुटीमुळे भीषण विध्वंस झाला आहे. सिंहगड ते बागीपुलापर्यंतच्या भागात चिखल, दगड आणि पाण्याचा मोठा लोट आल्याने आजूबाजूला राहणारे शेकडो लोक रात्रीच्या अंधारात जीव वाचवण्यासाठी पळून गेले. याचदरम्यान एकाच कुटुंबातील पाच जण बेपत्ता आहेत, तर दोन नेपाळी वंशाचे लोकही बेपत्ता आहेत. शिमला जिह्यातील रामपूरमधील झाखरीच्या समेज भागात जलविद्युत प्रकल्पाजवळ ढग फुटले. या घटनेत 33 लोक बेपत्ता आहेत. या घटनेमुळे सर्वत्र हाहाकार माजला आहे. पाण्याच्या प्रवाहामुळे रस्त्यांचीही दुरवस्था झाली आहे. घटनास्थळी पोहोचण्यासाठी बचाव पथक आणि अधिकाऱ्यांना सुमारे 2 किलोमीटर पायपीट करावी लागली.

शिमला शहराजवळील मेहली ते जंगा या रस्त्यावर सकाळी भूस्खलनाची घटना घडली असून या घटनेत कोणतीही जीवित वा वित्तहानी झाली नाही. मात्र या घटनेमुळे बहुमजली इमारतीला धोका निर्माण झाला आहे. यासोबतच इतर अनेक घरांनाही दरड कोसळल्याने धोका निर्माण झाला आहे.  कुल्लू येथे दोन पूल तुटले असून नऊ घरांचे नुकसान झाले आहे. तसेच 11 घरे पाण्याच्या प्रवाहाने वाहून गेल्याचे प्रशासकीय विभागाने सांगितले. पुरात 6 दुकानेही वाहून गेली आहेत. तसेच कुल्लूच्या मलाना येथे पार्वती नदीला पूर आला आहे. येथे मलाणा पूल वाहून गेला आहे. एनडीआरएफची टीम पाठवण्यात आली आहे. येथे 9 लोक अडकले आहेत. मंडी जिह्यातील पदरच्या तिक्कन थालुकोट गावात दरड कोसळली असून येथे दोन जणांचा मृत्यू झाला असून आठ जण बेपत्ता आहेत. येथे तीन ते चार घरांची पडझड झाली आहे. यात एक जण जखमी झाला असून त्याला ऊग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मुख्यमंत्र्यांनी घेतली आपत्कालीन बैठक

हिमाचल प्रदेशात बुधवारी रात्री उशिरा पाच ठिकाणी ढगफुटीच्या घटना घडल्यानंतर मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुक्खू यांनी नुकसानीचा आढावा घेण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत तातडीची बैठक घेतली. तत्पूर्वी, मुख्यमंत्र्यांनी गुरुवारी सकाळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. न•ा, राष्ट्रीय काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करत अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत चर्चा केली. राज्यातील ढगफुटीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीची माहिती दिली. या आपत्तीला तोंड देण्यासाठी केंद्र सरकारने सर्व पातळीवर उदारपणे सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. कुल्लू जिह्यात तीन ठिकाणी आणि मंडी आणि शिमला येथे प्रत्येकी एका ठिकाणी ढगफुटी झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ढगफुटी आणि मुसळधार पावसामुळे गेल्या 12 तासांत एक राष्ट्रीय महामार्ग आणि पाच रस्ते ठप्प झाले, तर तीन पुलांचे नुकसान झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Advertisement
Tags :

.