इस्रायल-अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे प्रचंड नुकसान
अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यांदरम्यान इराणच्या 1.13 लाखाहून अधिक नागरी संपत्तीचे नुकसान झाले आहे. यात घर, शाळा, दुकाने आणि मदतशिबिरे सामील आहेत. हल्ल्यांमुळे 90,063 घरे, 20,059 दुकाने आणि बाजार, 760 शिक्षण केंद्रे आणि 18 रेड क्रिसेंटशी निगडित सुविधा नष्ट झाल्या आहेत. याचबरोबर मदतकार्यात सामील 3 हेलिकॉप्टर्स नष्ट झाल्याचे इराणच्या रेड क्रिसेंट सोसायटीने सांगितले आहे.
हा आकडा इराणच्या नागरिकांना झालेले नुकसान दशवितो. इराणकडून आंतरराष्ट्रीय स्तरावर याला गंभीर मुद्दा ठरविले जातेय. 28 फेब्रुवारीपासून अमेरिका आणि इस्रायल मिळून इराणवर सैन्य कारवाई करत आहेत. इराणच्या अधिकाऱ्यांनुसार या हल्ल्यांमध्ये हजारो लोक मारले गेले असून लाखो लोक प्रभावित झाले आहेत.
घरं तुटल्यामुळे लाखो परिवार बेघर झाले, शाळा बंद झाल्याने मुलांचे शिक्षण थांबले, तर दुकाने उद्ध्वस्त झाल्याने उपजीविकेचे संकट उभे ठाकले आहे. हल्ले नागरी भागांवर होत असल्याने सर्वसामान्य नागरिक सर्वाधिक प्रभावित होत आहेत. इराणने देखील या हल्ल्यांना प्रत्युत्तर दिले आहेत. इराणने इस्रायलवर क्षेपणास्त्रs तसेच ड्रोन्स डागली आणि अनेक अरब देशांमधील अमेरिकेच्या सैन्यतळांवर हल्ले केले आहेत. इराणच्या प्रतिहल्ल्यांमध्sयही काही नागरी भागांना नुकसान पोहोचत जीवितहानी झाली आहे.