For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

साताऱ्यातील टिळक मेमोरियल चर्चमध्ये नाताळानिमित्त सामूहिक प्रार्थना; धार्मिक कार्यक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद

03:50 PM Dec 25, 2025 IST | NEETA POTDAR
साताऱ्यातील टिळक मेमोरियल चर्चमध्ये नाताळानिमित्त सामूहिक प्रार्थना  धार्मिक कार्यक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद
Advertisement

                  साताऱ्यात प्रभु येशूच्या जन्मोत्सवानिमित्त भक्तिमय प्रार्थना

Advertisement

सातारा : साताऱ्यातील टिळक मेमोरियल चर्च येथे नाताळाच्या निमित्ताने आज श्रद्धेच्या आणि बंधुत्वाच्या वातावरणात सामूहिक प्रार्थना करण्यात आली. सकाळपासून विविध धार्मिक कार्यक्रमांना भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला.

चर्चमध्ये प्रभु येशूच्या जन्मोत्सवानिमित्त विशेष प्रार्थना, स्तुतीगीते आणि मेणबत्त्यांच्या प्रकाशात शांततेचा संदेश देणारे कार्यक्रम पार पडले. बालकांद्वारे सादर करण्यात आलेल्या नाताळगीतांनी वातावरण अधिक भक्तिमय झाले.

Advertisement

या प्रसंगी सर्व धर्मातील नागरिकांनी एकत्र येत प्रेम, सद्भावना आणि सामाजिक ऐक्याचा संदेश दिला. नाताळ सणाच्या माध्यमातून समाजात शांतता आणि मानवसेवेचा संदेश पोहोचावा, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली..

Advertisement
Tags :

.