महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

‘एक्स्पर्ट व्हॉल्व्हज’ औद्योगिक आस्थापनामध्ये सामूहिक अग्निहोत्र

10:55 AM Mar 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पर्जन्यसुक्त, शांतीसुक्त, नक्षत्रसुक्तचा मंत्रघोष : ‘अग्निहोत्र’ पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन

Advertisement

बेळगाव : अग्निहोत्र दिनाचे औचित्य साधून उद्यमबाग येथील विनायक लोकूर संचालित ‘एक्स्पर्ट व्हॉल्व्हज’ या औद्योगिक आस्थापनामध्ये मंगळवारी सूर्यास्तावेळी सामूहिक अग्निहोत्र करण्यात आले. याप्रसंगी 52 वर्षांपासून अग्निहोत्र उपासना करणारे पुण्याचे ज्येष्ठ उपासक एस. के. कुलकर्णी, उद्योजक दिलीप चिटणीस उपस्थित होते. प्रारंभी संजीव आचार्य वाळवेकर, गुरुप्रसाद जोशी व दर्शन कुलकर्णी यांनी पर्जन्यसुक्त, शांतीसुक्त, नक्षत्रसुक्तचा मंत्रघोष केला. यानंतर एस. के. कुलकर्णी यांनी अग्निहोत्र उपासनेबद्दल मार्गदर्शन केले. अग्निहोत्र ही कोणालाही करता येणारी, कोणतीही सक्ती नसणारी व अत्यल्प वेळामध्ये व अत्यल्प खर्चामध्ये केली जाणारी उपासना आहे. आज पाश्चात्य देशांमध्ये ही उपासना केली जात आहे. मात्र, वेद हे भारतीय ऋषीमुनींनी निर्माण केलेले आहे. परदेशात त्यांचा अभ्यास होत असताना आपण त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. अग्निहोत्र केल्याने काय फायदा होतो, याचा विचार करू नका. तुम्हाला त्याचा आपोआप अनुभव येईल, असे त्यांनी सांगितले. यानंतर दिलीप चिटणीस यांच्या हस्ते एस. के. कुलकर्णी यांचा शाल अर्पण करून व फळ करंडी देऊन सत्कार करण्यात आला. याचवेळी एस. के. कुलकर्णी लिखित ‘अग्निहोत्र’ या पुस्तकाचे प्रकाशन रुपा लोकूर, आशा नायक व मनीषा सुभेदार यांच्या हस्ते करण्यात आले. राजेश्वरी यांनी कानडी भाषेमध्ये एस. के. कुलकर्णी यांच्या भाषणाचा अनुवाद केला. यावेळी अनुपा रजपूत यांनी एव्हरेस्ट शिखर प्रवासावेळी अग्निहोत्र कसे केले, याची माहिती दिली. डॉ. वैष्णवी काथवटे यांनी आयुर्वेद उपचारामध्ये अग्निहोत्र भस्म कसे उपयोगी ठरते याची माहिती दिली. आशा व तेजस्वी नाईक यांनी देश प्रवासादरम्यान दररोज अग्निहोत्र कसे केले, याची माहिती दिली. यानंतर सूर्यास्ताला सामूहिक अग्निहोत्र करून विश्व कल्याणाची शांततेची प्रार्थना करण्यात आली.
Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article