महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

मेरी कॉमने पथक प्रमुख पद सोडले

06:44 AM Apr 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

भारताची जागतिक दर्जाची महिला मुष्टीयोद्धी तसेच सहावेळा विश्वविजेतेपद मिळविणारी एमसी मेरी कॉमने आगामी पॅरीस ऑलिम्पिकसाठीचे पथक प्रमुख पद काही वैयक्तिक समस्येमुळे सोडले आहे. सदर माहिती भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षा पी. टी. उषाने दिली आहे.

Advertisement

41 वर्षीय मेरी कॉमची येत्या जुलै-ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या पॅरीस ऑलिम्पिक स्पर्धेसाठी भारतीय पथकाच्या प्रमुखपदी निवड यापूर्वीच करण्यात आली होती. दरम्यान काही वैयक्तिक समस्यामुळे आपण ही जबाबदारी स्वीकारू शकत नसल्याचे लेखी पत्र मेरी कॉमने भारतीय ऑलिम्पिक संघटनेला पाठविले आहे. या स्पर्धेसाठी भारतीय पथकाला मेरी कॉमने आपल्या शुभेच्छा दिल्या आहेत. 21 मार्च रोजी भारतीय ऑलिम्पिक संघटनेने मेरी कॉमची भारतीय पथक प्रमुखपदी नियुक्तीची घोषणा केली होती. मेरी कॉमने 2012 च्या लंडन ऑलिम्पिक स्पर्धेत कास्यपदक मिळवले होते. पॅरीस ऑलिम्पिक स्पर्धा 26 जुलै ते 11 ऑगस्ट दरम्यान होणार आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article