कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘मारुती’ची वाहन निर्यात 18 टक्क्यांनी वाढली

06:44 AM Oct 30, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सियामच्या आकडेवारीमधून माहिती समोर

Advertisement

नवी दिल्ली :

Advertisement

चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत (एप्रिल-सप्टेंबर) भारतातून प्रवासी वाहनांची निर्यात 18 टक्क्यांनी वाढून 4,45,884 युनिट्स झाली, जी गेल्या वर्षी याच कालावधीत 3,76,679 युनिट्स होती. या क्षेत्रात मारुती सुझुकीने आघाडी घेत 2 लाखांहून अधिक वाहनांची निर्यात केली आहे, असे सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्चरर्स (सियाम) यांनी आपल्या अहवालामधून सांगितले आहे. दरम्यान प्रवासी कारची निर्यात 2,29,281 युनिट्सपर्यंत वाढली, जी गेल्या वर्षी 2,05,091 युनिट्सच्या तुलनेत 12 टक्के अधिक आहे. युटिलिटी व्हेईकल्स (यूव्ही) ची निर्यातही वाढली आणि 2,11,373 युनिट्सवर पोहोचली, जी गेल्या वर्षीच्या तुलनेत 26 टक्के जास्त राहिली आहे. याशिवाय, व्हॅनची निर्यातही 5,230 युनिट्सपर्यंत वाढली, जी गेल्या वर्षीच्या याच कालावधीपेक्षा 36.5 टक्के जास्त आहे. सियामच्या आकडेवारीनुसार, भारतीय वाहन उद्योगाची निर्यात सातत्याने वाढत आहे आणि जागतिक बाजारपेठेत भारतीय वाहनांची मागणी वाढत आहे.

मारुतीने केल्या 2 लाख कार्स निर्यात

या कालावधीत मारुती सुझुकीने 2,05,763 युनिट्सची निर्यात केली, जी गेल्या वर्षीच्या 1,47,063 युनिट्सच्या तुलनेत 40 टक्क्यांनी जास्त आहे. ह्युंडई मोटर इंडियाने 99,540 युनिट्सची निर्यात केली, जी गेल्या वर्षीच्या तुलनेत 17टक्के जास्त आहे, तर निस्सान मोटर इंडियाने 37,605 युनिट्सची निर्यात केली, जी गेल्या वर्षीच्या 33,059 युनिट्सपेक्षा जास्त आहे.

इतर कंपन्यांमध्ये, फोक्सवॅगन इंडियाने 28,011 युनिट्स, टोयोटा किर्लोस्कर मोटरने 18,880 युनिट्स, किआ इंडियाने 13,666 युनिट्स आणि होंडा कार्स इंडियाने 13,243 युनिट्सची निर्यात केली. सियामने म्हटले आहे की, या वाढीचे मुख्य कारण जागतिक बाजारपेठेतील स्थिर मागणी आहे, विशेषत: मध्य पूर्व आणि लॅटिन अमेरिकेतील मजबूत कामगिरी आहे. अहवालात म्हटले आहे की भारतीय कार उत्पादक त्यांच्या निर्यात बाजारपेठांमध्ये विविधता आणत आहेत.

24 देशात निर्यातीत वाढ

पहिल्या सहा महिन्यांत 24 देशांमध्ये निर्यात वाढली, तर अमेरिकेतील जास्त शुल्कामुळे निर्यात कमी झाली. हे 24 देश आहेत: कोरिया, युएई, जर्मनी, टोगो, इजिप्त, व्हिएतनाम, इराक, मेक्सिको, रशिया, केनिया, नायजेरिया, कॅनडा, पोलंड, श्रीलंका, ओमान, थायलंड, बांगलादेश, ब्राझील, बेल्जियम, इटली आणि टांझानिया.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article