मारुतीची एसयूव्ही क्हिक्टोरिस बाजारात
भारतीय बाजारात हायब्रीड व सीएनजीसोबत उपलब्ध : किंमत 10.50 लाख
नवी दिल्ली :
मारुती सुझुकीने भारतात नवीन कॉम्पॅक्ट एसयूव्ही व्हिक्टोरिस लाँच केली आहे. 2023 मध्ये लाँच होणारी ग्रँड विटारानंतर ही मारुतीची दुसरी एसयूव्ही आहे. ती कंपनीच्या एरिना डीलरशिप नेटवर्कद्वारे विकली जाणार आहे. कंपनीने तिची सुरुवातीची एक्मस-शोरूम किंमत 10.50 लाख रुपये ठेवली आहे. ती 6 प्रकारांमध्ये उपलब्ध आहे : यामध्ये एलएक्सआय, व्हीएक्सआय, झेडक्सआय, झेडएक्सआय(ओ), झेडएक्सआय प्लस आणि झेडएक्सप्लस (ओ) आकर्षक बाह्य डिझाइन आणि आधुनिक इंटीरियरसह, व्हिक्टोरिसमध्ये मोठी टचक्रीन, डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले हायब्रिड आणि सीएनजी पर्यायासह लेव्हल-2 एडीएएस सुरक्षा वैशिष्ट्या यासह अनेक नवीन वैशिष्ट्योदेखील दिलेली आहेत.
भारत एनसीएपीने केलेल्या क्रॅश चाचण्यांमध्ये कारला 5-स्टार सुरक्षा रेटिंग मिळालेले नाही. तिची रचना इलेक्ट्रिक एसयूव्ही ई-विटारा वरून घेतली आहे. ही कार ह्युंदाई क्रेटा, किया सेल्टॉस, टोयोटा अर्बन क्रूझर हायरायडर, एमजी एस्टर आणि होंडा एलिव्हेट सारख्या कारशी स्पर्धा करेल.
डिझाइन: आधुनिक आणि बोल्ड लूकची ही गाडी असून व्हिक्टोरिसमध्ये समोर जाड एलईडी हेडलाइट्स आहेत, ज्या स्लिम ग्रिल कव्हरने वेढलेल्या आहेत आणि वर क्रोम स्ट्रिपने सजवलेल्या आहेत. संपूर्ण बॉडीभोवती जाड प्लास्टिक क्लॅडिंग देण्यात आले आहे, जे सिल्व्हर स्किड प्लेटसह रफ आणि टफ लूक देते.
साईड प्रोफाइलमध्ये 18-इंच अलॉय व्हील्स, सिल्व्हर रूफ रेल आणि स्क्वेअर-ऑफ बॉडी क्लॅडिंग आहे, जे त्याला स्पोर्टी लूक देते. मागील बाजूस सेग्मेंटेड एलईडी लाईट बार आणि ‘व्हिक्टोरिस’ बॅजिंग आहे. एकूणच, ही डिझाइनमध्ये आधुनिक आणि प्रीमियम दिसते, जी शहरातील रस्त्यांपासून ते महामार्गांपर्यंत उपयुक्त ठरेल.
इंजिन आणि परफॉर्मन्स: तीन पर्याय दिले जातील. व्हिक्टोरिसमध्ये प्रत्येक ग्राहकाच्या गरजेनुसार तीन पॉवरट्रेन आहेत: माइल्ड हायब्रिड पेट्रोल: 1.5-लिटर 4-सिलेंडर इंजिन गाडीत दिलेले आहे.