मारुतीचा समभाग 4 टक्के घसरला
06:55 AM Jan 08, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मुंबई :
Advertisement
शेअरबाजारात ऑटो निर्देशांकाची कामगिरी काहीशी निराशादायी बुधवारी दिसून आली. यात दिग्गज ऑटो कंपनी मारुती सुझुकीचा समभाग बुधवारी जवळपास 4.5 टक्के इतका घसरत इंट्रा डे दरम्यान 16567 रुपयांवर घसरला होता. गेल्या 11 महिन्यात पाहता सदरचा समभाग एकाच दिवशी पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात घसरलेला दिसला. गेल्या 6 दिवसात सदरचा समभाग तेजीत कार्यरत होता. अखेर बुधवारी समभागाची तेजी थांबली. ब्रोकरेज फर्म एचएसबीसीने मारुती सुझुकीच्या समभागाबाबत आशावाद व्यक्त केला असून समभाग खरेदी करायला हरकत नसल्याचे म्हटले आहे.
Advertisement
Advertisement