मारुतीची नवी ग्रँड विटारा बाजारात लाँच
किमत 12 लाखाच्या आत : अनेक वैशिष्ट्यांचा समावेश
गुडगाव : देशातील प्रमुख कार निर्मिती कंपनी मारुती सुझुकीने आपल्या नव्या सुधारित ग्रँड विटारा या गाडीचे नुकतेच लॉन्चिंग केले आहे. अनेक वैशिष्ट्यांसह ही गाडी कंपनीने सादर केली आहे.
मारुती सुझुकीची एसयुव्ही गटातील नवी ग्रँड विटारा 2025 एडिशन अनेक बदलांसह सादर करण्यात आली आहे. यामध्ये सहा एअरबॅक्स देण्यात आल्या असून हिल होल्ड असिस्ट, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम, फ्रंट अँड रियर डिस्क ब्रेक, अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टीम, थ्री पॉईंट इएलआर सीट बेल्ट, इलेक्ट्रॉनिक ब्रेकफोर्स डिस्ट्रीब्यूशन यासारख्या सुरक्षित वैशिष्ट्यांसह गाडी सादर करण्यात आली आहे.
इतर सुविधा व किंमत
याशिवाय वायरलेस कनेक्टिव्हिटीसह 9 इंचाचा स्मार्ट प्ले प्रो प्लस एंटरटेन्मेंट सिस्टीम, हेडअप डिस्प्ले, 360 ह्यू कॅमेरा, वायरलेस चार्जिंग, पॅनारमिक सनरुफ, व्हेंटिलेटेड सीट्स अशा सुविधा देण्यात आल्या आहेत. या गाडीची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत अंदाजे 11.42 लाख रुपये असणार असल्याचे समजते. यामधील डेल्टा प्लस स्ट्राँग हायब्रिड कारची किंमत 16.99 लाख रुपये एक्सशोरुम असणार आहे.