‘मारुती’ची पहिली ईव्ही ई-विटारा 17 रोजी बाजारात
मार्चपासून कार विक्रीला प्रारंभ होणार
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
देशातील सर्वात मोठी कार निर्मिती कंपनी मारुती सुझुकीने आपली नवीन ई विटारा ही गाडी ईलेक्ट्रिक मॉडेलसोबत एसयूव्हीच्या सादरीकरणाबाबत संकेत दिले आहेत. सदरची गाडी ही येत्या 17 जानेवारी रोजी भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो 2025 प्रदर्शनात सादर केली जाणार आहे. ई विटाराने 2024 मध्ये इटलीच्या मिलानमध्ये आपली पहिली सार्वजनिक उपस्थिती दर्शवली होती, आणि मारुतीची इव्हीएक्सच्या कॉन्सेप्टवर आधारीत हे मॉडेल राहणार असल्याची माहिती आहे. ई विटार मारुती सुझुकीचे पहिले इलेक्ट्रिक मॉडेल आहे आणि मार्च 2025 मध्ये भारतीय बाजारात विक्री सुरु करणार असल्याचे संकेतही दिले आहेत. सदरच्या गाडीची टक्कर ही महिंद्रा बीई 6 आणि टाटा कर्व्ह सोबत राहणार आहे तर एमजी विंडसर ईव्ही आणि येणाऱ्या ह्युंदाई क्रेटा ईव्ही यांचाही समावेश राहणार आहे.