मारुतीची पहिली ईव्ही कार ई-विटाराची किंमत जाहीर
543 किमीचे दमदार मायलेज देणार : 16 लाखापर्यंत किमत
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
मारुती सुझुकीने त्यांच्या पहिल्या इलेक्ट्रिक कार ई-विटाराची संपूर्ण किंमत यादी जाहीर केली आहे. ई-विटारा 49केडब्लूएच आणि 61 केडब्लूएच असे दोन बॅटरी पॅक पर्यायांसह येते. कंपनीचा दावा आहे की ही कार एकदा पूर्ण चार्ज केल्यावर 543 किलोमीटरपेक्षा जास्त धावू शकते. इलेक्ट्रिक एसयूव्हीमध्ये 360 डिग्री कॅमेरा, एअरबॅग्ज आणि लेव्हल-2 अॅडव्हान्स्ड ड्रायव्हिंग असिस्टन्स सिस्टम सारख्या सुरक्षा वैशिष्ट्यांसह येते. त्याची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 15.99 लाख आहे. त्याच वेळी, बीएएएस प्रोग्राम अंतर्गत बॅटरीशिवाय कार 10.99 लाखांना खरेदी करता येते.
सदरची किमत ही सुरुवातीची असल्याचे सांगितले जात आहे. ही कार मारुतीच्या प्रीमियम नेक्सा शोरूममधून विकली जाईल. मागच्या जानेवारीपासून इविटाराबाबत चर्चा रंगलेली होती. अखेर सदरची गाडी बाजारात दाखल झाली आहे. मारुतीची नवी इव्ही विटारा महिंद्रा बीई 6 इ (18.9 लाख रुपये), ह्युंडाई क्रेटा इव्ही (18 लाखापासून), टाटा कर्व्ह (18 लाख रुपये) व एमजी झेडएस इव्ही (17.9 लाख रुपये) यासारख्या गाड्यांना टक्कर देणार आहे. मध्यम आकाराच्या एसयुव्ही गटात 40 टक्के इव्ही गाड्या बॅटरीआधारीत आहेत. महिन्याला 17,594 गाड्यांचे वितरण होत आहे.