महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सावंतवाडी - शिरोडा नाक्यावर मारुती व्हॅन पलटी

03:33 PM Jul 31, 2024 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

चौघेजण अडकले व्हॅनमध्ये

Advertisement

सावंतवाडी । प्रतिनिधी

Advertisement

सावंतवाडी शहरात शिरोडा नाका येथे बुधवारी दुपारी पावणेतीनच्या सुमारास मारुती व्हॅन पलटी झाली . मारुती व्हॅन मध्ये चौघेजण अडकले होते.त्या चौघांना नागरिकांनी शिताफीने बाहेर काढत वाचवले. ही घटना शिरोडा नाका येथील देशपांडे हॉस्पिटल येथे घडली. होडावडा येथील कीस्तू फर्नांडीस हे घरात पडून जखमी झालेल्या आपल्या आईला उपचारासाठी मारुती व्हॅनने घेऊन देशपांडे हॉस्पिटलमध्ये आले होते. त्यांच्यासोबत पत्नी आणि तळवडे येथील एक महिला होती. डॉक्टरना आईला दाखवल्यानंतर ते पुन्हा घरी जात होते .देशपांडे हॉस्पिटल येथील मोठ्या रॅमवर मारुती मागे घेताना ती पलटी झाली . त्यात कीस्तु फर्नांडिस त्यांची आई पत्नी आणि तळवडे येथील एक महिला व्हॅनमध्ये अडकली. स्थानिक नागरिकांनी तत्काळ या सर्वांना बाहेर काढत वाचवले.

Advertisement
Tags :
# accident # sawantwadi # shiroda #
Next Article