For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

देशात सीएनजी कार्सच्या वाढत्या मागणीवर लक्ष केंद्रीत करणार मारुती

06:47 AM Jul 28, 2026 IST | Tarun Bharat Portal
देशात सीएनजी कार्सच्या वाढत्या मागणीवर लक्ष केंद्रीत करणार मारुती
Advertisement

वृत्तसंस्था,  नवी दिल्ली

Advertisement

देशातील सर्वात मोठी कार निर्माती कंपनी मारुती सुझुकी आता येत्या काळात सीएनजी कार्सवर अधिक लक्ष केंद्रीत करणार असल्याचे समजते. गेल्या काही काळात कार छोटी असो की मोठी सीएनजी इंधनाच्या पर्याययुक्त कार्सना ग्राहकांची पसंती मिळताना दिसते आहे. ही मागणी पूर्ण करण्यासाठी कंपनी येत्या काळात प्रयत्न करणार आहे. पेट्रोल व डिझेल इंधनाच्या वाढत्या किमतीच्या पार्श्वभूमीवर आता एसयुव्ही गटातील कार खरेदी करणारे ग्राहक सीएनजी इंधनाचा पर्याय विचारात घेऊ लागले आहेत. हेच लक्षात घेऊन यंदा मारुती सीएनजी कार्सच्या विक्रीत वाढीचे नवे लक्ष्य साध्य करण्याहेतूने तयारी करत आहे.

काय आहे लक्ष्य

Advertisement

कंपनीने चालू आर्थिक वर्षात अंदाजे 9 लाख सीएनजी इंधनावर चालणाऱ्या कार्सची विक्री करण्याचे ध्येय बाळगून आहे. हे लक्ष्य जर का साध्य झालं तर तर सीएनजी कार्सच्या विक्रीत यंदा मागच्या तुलनेत 30 टक्के वाढ दिसून येईल. मागच्या वर्षी कंपनीने देशांतर्गत बाजारात 7 लाख सीएनजी वाहने विकली आहेत. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत कंपनीने 2.2 लाख सीएनजी वाहनांची विक्री केली आहे. मागच्या वर्षाच्या समान अवधीतील विक्रीची यावेळची आकडेवारी पाहता विक्रीत 58 टक्के इतकी वृद्धी दिसली आहे.

सर्वच प्रकारात सीएनजीला पसंती

कंपनीचे म्हणणे आहे की पश्चिम आशियातील तणावाने इंधनाच्या किमतीत वाढ झाली आहे. याचा परिणाम ग्राहकांवर होतो आहे. आता ग्राहक कारची खरेदी करताना ती दीर्घकाळ सेवा तर देईलच शिवाय खर्चही जास्त देणारी नसेल, हे पाहात आहेत. आता यातून सीएनजी इंधनाच्या गाड्यांना मागणी वाढताना दिसते आहे. सीएनजी गटात काही वर्षापूर्वीपर्यंत छोट्या कार्सच पसंतीस उतरल्या होत्या. पण आता एसयुव्ही गटातही सीएनजी पर्यायाच्या गाड्यांना मागणी होते आहे.

Advertisement
Tags :

.