For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मारुती स्विफ्ट स्पेशल आवृत्ती ‘ब्लिट्झ’ लाँच

06:28 AM Oct 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
मारुती स्विफ्ट स्पेशल आवृत्ती ‘ब्लिट्झ’ लाँच
Advertisement

सुरुवातीची किंमत 6.49 लाख रुपये : सणासुदीसाठी मारुतीची 5 वी आवृत्ती

Advertisement

नवी दिल्ली :

मारुती सुझुकीने सणासुदीसाठी स्विफ्ट ‘ब्लिट्झ’ ही स्पेशल आवृत्ती सादर केली आहे. स्विफ्ट ब्लिट्झ पाच प्रकारांमध्ये उपलब्ध होणार आहे. एलएक्सआय, व्हीएक्सआय, व्हीएक्सआय एएमटी, व्हीएक्सआय (ओ) आणि व्हीएक्सआय (ओ) एएमएटी या सर्व प्रकारांमध्ये उपलब्ध वैशिष्ट्यांव्यतिरिक्त, मारुतीने ब्लिट्झवर रियर अंडरबॉडी स्पॉयलर, बूट टॉप स्पॉयलर, फॉग लॅम्प्स, इल्युमिनेटेड डोअर सिल्स, डोअर व्हिझर आणि साइड मोल्डिंग्स अशी वैशिष्ट्योही जोडली आहेत.

Advertisement

ब्लिट्झची किंमत

ब्लिट्झची किंमत 6.49 लाख ते 8.02 लाख रुपये (एक्स-शोरूम) दरम्यान आहे. 49,848 रुपये किमतीचे किट मारुती स्विफ्ट ब्लिट्झच्या खरेदीदारांना मोफत दिले जात आहे. मारुती एरिना डीलर्स मर्यादित कालावधीसाठी स्विफ्ट ब्लिट्झची किरकोळ विक्री करतील.

मारुती स्विफ्ट ब्लिट्झमध्ये 1.2-लिटर तीन-सिलेंडर इंजिन आहे जे पेट्रोलवर 82एचपी आणि 112एनएम आणि सीएनजीवर 70एचपी आणि 112एनएम जनरेट करते. पेट्रोलच्या स्वरूपात, त्याला एक मानक 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स मिळतो.

सणासुदीसाठी मारुतीची विशेष आवृत्ती

स्विफ्ट ब्लिट्झ ही सणासुदीच्या हंगामासाठी मारुतीची पाचवी विशेष आवृत्ती आहे. या सणासुदीच्या हंगामात विक्री वाढवण्यासाठी ब्रँड हे करत आहे. कंपनीने गेल्या काही महिन्यांत बलेनो रीगल एडिशन, ग्रँड विटारा डोमिनियन एडिशन, वॅगन आर वॉल्ट्ज एडिशन आणि इग्निस रेडियंस एडिशन लॉन्च केले आहेत.

Advertisement
Tags :

.