तिमाहीमध्ये मारुती सुझुकीचा नफा 4 टक्क्यांनी वधारला
मुंबई : ऑटोमोबाइल कंपनी मारुती सुझुकी इंडियाने 2025-26 या आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत एकूण 49,891 कोटी रुपयांचा महसूल नोंदवला. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही वाढ 29टक्के आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीने 38,752 कोटी रुपये कमाई केली होती. ऑक्टोबर ते डिसेंबरच्या तिमाहीत कंपनीने 6.67 लाख गाड्या विकल्या आहेत. एकूण महसुलातून पगार, कर, कच्च्या मालाचा खर्च यासारखे खर्च वजा केल्यानंतर, कंपनीला निव्वळ नफा म्हणून 3,794 कोटी रुपये मिळाले आहेत. 2025 च्या ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीपेक्षा हे नफ्याचे प्रमाण 4 टक्के जास्त आहे. गेल्या वर्षी कंपनीला 3,659 कोटी रुपयांचा नफा झाला होता.महसूल 29 टक्क्यांनी वाढून 49,891 कोटी रुपयांवर पोहोचला.तिसऱ्या तिमाहीत कंपनीने उत्पादने आणि सेवांच्या विक्रीतून 49,891 कोटी रुपयांचा महसूल मिळवला. वर्षाच्या आधारावर त्यात 29 टक्केची वाढ झाली आहे. ऑक्टोबर-डिसेंबर 2025 मध्ये कंपनीने 38,752 कोटी रुपयांचा महसूल मिळवला होता.