For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

मारुती सुझुकीचा नफा 26 टक्क्यांनी घसरला

06:46 AM Oct 29, 2026 IST | Tarun Bharat Portal
मारुती सुझुकीचा नफा 26 टक्क्यांनी घसरला
Advertisement

घसरणीसह नफा 2,466 कोटींवर

Advertisement

त. भा. वृत्तसंस्था

नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडने दुसऱ्या तिमाहीत निव्वळ नफ्यात वार्षिक 26.4 टक्के घट नोंदवली असून तो 2,466 कोटींवर आला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत तो 3,349 कोटी होता. तथापि, कंपनीचा महसूल 26 टक्केंनी वाढून 53,355 कोटींवर पोहोचला, जो गेल्या वर्षी याच तिमाहीत 42,344 कोटी होता.  पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे कच्च्या मालाच्या आणि वस्तूंच्या (तेल-वायू) किमतीत लक्षणीय वाढ झाली आहे. यामुळे कंपनीचा खर्चही वाढला आहे. परिणामी कंपनीच्या नफ्यावर परिणाम झाला आहे. दुसऱ्या तिमाहीत कंपनीचा परिचालन नफा 17 टक्केंनी घसरला.

Advertisement

आर्थिक वर्ष 2026-27 च्या दुसऱ्या तिमाहीत कंपनीचा परिचालन नफा मागील वर्षीच्या याच तिमाहीतील 3,382 कोटींच्या तुलनेत वार्षिक 17.1 टक्क्यांनी घसरून 2,803 कोटींवर आला. मारुतीने परिचालन नफ्यातील या घसरणीचे कारण वस्तूंच्या किमती असल्याचे म्हटले आहे. तथापि, एप्रिल-जून तिमाहीच्या तुलनेत परिचालन नफ्यात तिमाही-दर-तिमाही 10.8 टक्के वाढ नोंदवली गेली. कंपनीचा निव्वळ नफा 3,302 कोटींवरून 2,414 कोटींवर घसरला. मारुतीचे निकाल तज्ञांच्या अंदाजाप्रमाणेच होते.

Advertisement
Tags :

.