For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मारुती सुझुकी करणार 35 हजार कोटींची गुंतवणूक

06:11 AM Jan 20, 2026 IST | Tarun Bharat Portal
मारुती सुझुकी करणार  35 हजार कोटींची गुंतवणूक
Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

Advertisement

भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रातील दिग्गज कंपनी मारुती सुझुकी येत्या काळात 35 हजार कोटी रुपये गुंतवणूक करण्याची तयारी करत आहे. गुजरात राज्यामध्ये होणाऱ्या कारखान्यात ही गुंतवणूक केली जाणार आहे. सदरच्या कारखान्यामध्ये अतिरिक्त 10 लाख वाहनांचे उत्पादन घेतले जाणार आहे. भारतातील ग्राहकांची वाढती मागणी लक्षात घेऊन उत्पादन वाढीवर भर दिला जाणार आहे.

वार्षिक उत्पादन 24 लाखावर

Advertisement

जागतिक स्तरावर पाहता कंपनीचे स्थान तिसऱ्या क्रमांकावर असून कारखान्यामध्ये नव्याने उत्पादनाची सुरू 2029 मध्ये केली जाणार आहे. यायोगे एकंदर वार्षिक उत्पादन कंपनीचे 2.4 दशलक्ष इतके होणार आहे. सध्याला कंपनीकडे  ग्राहकांची कारची मागणी मोठ्या प्रमाणात आहे

डिसेंबरमध्ये 1 लाख 78 हजार वाहन विक्री

देशांतर्गत विक्रेत्यांच्या माध्यमातून कंपनीची विक्री 37 टक्के इतकी डिसेंबरमध्ये वाढली आहे. डिसेंबरमध्ये 178643 इतक्या वाहनांची विक्री कंपनीने केली आहे. सदरच्या नव्या कारखान्यासाठी जागा खरेदीसाठी 4960 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याला संचालक मंडळाने मान्यता दिली आहे.

Advertisement
Tags :

.