For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मारुती सुझुकी गुजरातमध्ये 10 हजार कोटीची गुंतवणूक करणार

06:32 AM Mar 31, 2026 IST | Tarun Bharat Portal
मारुती सुझुकी गुजरातमध्ये 10 हजार कोटीची गुंतवणूक करणार
Advertisement

पाचवा कारखाना उभारणार : अडीच लाख वाहनांचे उत्पादन

Advertisement

वृत्तसंस्था/ गांधीनगर

ऑटोमोबाईल क्षेत्रातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकी गुजरातमध्ये कार उत्पादन कारखाना उभारणार असून त्याकरिता 10 हजार 189 कोटी रुपये गुंतवणूक करणार आहे. सदरचा नवा कारखाना 2029 पर्यंत तयार होणार आहे. कंपनीने या संदर्भातली माहिती शेअर बाजाराला दिली आहे.

Advertisement

गुरुग्राम, मनेसर, खरखोदा आणि हंसलपुर या ठिकाणी कंपनीचे कारखाने असून येत्या काळात गुजरातमधील खोरज येथे आपला पाचवा कारखाना कंपनी उभारणीच्या कामाला सुरुवात करत आहे. मारुती सुझुकीच्या संचालक मंडळाने खोरजमधील नव्या कारखान्याच्या पहिल्या टप्प्यातील कामाला मंजुरी दिली आहे.

सदरच्या नव्या कारखान्यामध्ये वार्षिक 2 लाख 50 हजार इतक्या वाहनांची निर्मिती होऊ शकणार आहे. चार कारखान्यांमधून कंपनी जवळपास सध्याला 26 लाख वाहनांची निर्मिती करत आहे. जानेवारी 2024 मध्येच गुजरातमध्ये नव्या कारखान्याची स्थापना केली जाणार असल्याचे म्हटले होते. ज्याची वार्षिक उत्पादन क्षमता 10 लाख वाहन इतकी असणार आहे.

 40 लाख वाहन निर्मितीचे उद्दिष्ट

एकंदर टप्प्याटप्प्याने 35000 कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार असून सध्याला गांधीनगरमधील खोरज औद्योगिक इस्टेटमध्ये नवा कारखाना उभा राहत आहे. भविष्यातील विस्ताराचा विचार करता 2030-31 पर्यंत देशात 40 लाख वाहनांची उत्पादन करण्याची क्षमता साध्य करण्याचे लक्ष्य कंपनीने ठेवले आहे.

Advertisement
Tags :

.