For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मारुती सुझुकीने डिसेंबरमध्ये विकल्या 1 लाख 37 हजार कार्स

06:31 AM Jan 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
मारुती सुझुकीने डिसेंबरमध्ये विकल्या 1 लाख 37 हजार कार्स
Advertisement

2023 मध्ये 20 लाखाचा टप्पा पार : प्रवासी, व्यावसायिक वाहन विक्री घसरली : निर्यातीत झाली वाढ

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

देशातील मोठी दिग्गज कार निर्माती कंपनी मारुती सुझुकीने डिसेंबर 2023 मध्ये एकूण 1 लाख 37 हजार 551 कार्सची विक्री केली असून ही विक्री वर्षाच्या आधारावर 1.28 टक्के इतकी कमी दिसून आली. डिसेंबर 2022 मध्ये कंपनीने 1 लाख 39 हजार 347 कार्सची विक्री केली होती. प्रवासी वाहन, व्यावसायिक वाहन यांची विक्री 5.86 टक्के घसरुन 1 लाख 10 हजार 667 इतकी राहिली होती.

Advertisement

2023 मध्ये 20 लाख वाहनांची विक्री

दुसरीकडे मारुती सुझुकीने पहिल्यांदाच 2023 मध्ये 20 लाख इतक्या विक्रमी कार्सची विक्री करण्यात यश मिळवलं आहे. तर यासोबत 2 लाख 69 हजार 46 वाहनांची सर्वाधिक निर्यात (कॅलेंडर वर्ष) करण्यातही कंपनीने यश मिळवलं आहे.

कोणत्या गटात राहिली विक्री

डिसेंबर 2023 मध्ये देशांतर्गत प्रवासी वाहन विक्री 1 लाख 4 हजार 778 इतकी (6.46 टक्के)राहिली होती. डिसेंबरमध्ये ऑल्टो व एसप्रेसोसारख्या छोट्या कार्सचा खप 2557 इतका होता, जो मागच्या वर्षी समान महिन्यात 9765 इतका होता. बलेनो, सेलेरियो, डिझाइर, इग्निस, स्विफ्ट, टूर एस आणि वॅगनआर यांची विक्री डिसेंबर 2023 मध्ये 45,741 राहिली होती, जी डिसेंबर 2022 मध्ये 57,502 इतकी

होती. तर दुसरीकडे ब्रीझा, अर्टिगा, फ्राँक्स, ग्रँड विटारा, इनव्हिक्टो, जिम्नी, एस क्रॉस आणि एक्सएल-6 यासारख्या युटिलीटी वाहनांची विक्री 45,957 इतकी झाली होती. या तुलनेत डिसेंबर 2022 मध्ये 33,008 वाहनांची विक्री राहिली होती.

महिंद्रा, ह्युंडाईच्या वाहन विक्रीत वाढ

भारतातील अनेक वाहन निर्मात्यांनी डिसेंबर 2023 साठी विक्रीचे आकडे जाहीर केले आहेत. यापैकी बजाज, ह्युंडाई आणि महिंद्रा अँड महिंद्रा यांनी गेल्या वर्षी डिसेंबरमधील विक्रीचे आकडे जाहीर केले आहेत. बजाजने डिसेंबरमध्ये 3,26,806 वाहनांची विक्री केली. वार्षिक आधारावर 16 टक्के वाढ झाली आहे. तर ह्युंडाई आणि महिंद्रा अॅण्ड महिंद्राने अनुक्रमे 56,450 आणि 35,171 वाहनांची विक्री केली आहे. महिंद्राने डिसेंबरमध्ये 35,171 एसयुव्ही गटातील कार्सची विक्री केली आहे. वर्षाच्या आधारावर 24 टक्के वाढ कंपनीने दर्शवली आहे. दुसरीकडे डिसेंबरमध्ये 1819 वाहनांची निर्यात कंपनीने केली असून मागच्या तुलनेत निर्यात 41 टक्के कमी राहिली आहे. दुसऱ्या नंबरवरची मोठी कार निर्माती कंपनी ह्युंडाई इंडियाने 2023 च्या कॅलेंडर वर्षात 6 लाख 02 हजार 111 कार्सची विक्री केली आहे. कॅलेंडर वर्षात निर्यातीत 10 टक्के वाढ झाली असून 1 लाख 63 हजारहून अधिक वाहने विदेशात पाठवली गेली आहेत. डिसेंबरमध्ये देशांतर्गत विक्री 42,750 इतकी असून 13,700 वाहनांची निर्यात केली आहे.

Advertisement
Tags :

.