मारुती सुझुकी डिझायर 11 रोजी होणार लाँच
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
मारुती सुझुकीने त्यांच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या सेडान डिझायरचे नवीन पिढीचे मॉडेल सादर केले आहे. कंपनी 11 नोव्हेंबर रोजी कार लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. चौथी जनरेशन मारुती सुझुकी डिझायर कंपनीच्या हॅचबॅक मारुती स्विफ्ट प्लॅटफॉर्मवर आधारित आहे, परंतु त्याची रचना पूर्णपणे वेगळी आहे. कारमध्ये सनरूफ, मानक म्हणून 6 एअरबॅग्ज आणि अनेक सेगमेंट फर्स्ट फीचर्स देण्यात आले आहेत.
सेडान 5 प्रकारांमध्ये लॉन्च होणार
एलएक्सआय, व्हीएक्सआय, व्हीएक्सआ(ओ), झेडएक्सआय आणि झेडएक्सआय प्लस या अद्ययावत मॉडेलची एक्स-शोरूम किंमत 6.99 लाख रुपयांपासून सुरू होण्याची शक्यता आहे. सेडान सेगमेंटमध्ये त्याची स्पर्धा होंडा अमॅझे, ह्युंदाई अॅरो आणि टाटा टीयागो यांच्याशी होईल.
इंटीरियर: स्विफ्ट फेसलिफ्ट आणि फ्रँक्स प्रेरित डिझाइन
नवीन पिढीच्या डिझायरमध्ये स्विफ्ट फेसलिफ्ट, फ्रँक्स, बलेनो आणि ब्रेझा यांच्यापासून प्रेरित ब्लॅक आणि व्हाइट ड्युअल-टोन थीमसह सर्व-नवीन डॅशबोर्ड लेआउट आहे. यात 9.0-इंच फ्लोटिंग इन्फोटेनमेंट सिस्टम, स्लीक एसी व्हेंट्स आणि लोअर एचव्हीएसी कंट्रोल्स राहणार आहेत.