For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मारुतीने अल्टो के10 च्या 2,555 कार्स परत मागविल्या

06:53 AM Aug 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
मारुतीने अल्टो के10 च्या 2 555 कार्स परत मागविल्या
Advertisement

स्टीयरिंग गिअरबॉक्स असेंब्लीमध्ये दोष : कंपनी मोफत दुरुस्त करणार

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडने तांत्रिक बिघाडामुळे अल्टो के 10 या मॉडेलच्या जवळपास 2,555 युनिट्स परत मागवल्या आहेत. तथापि, कंपनीने रिकॉलमध्ये कोणत्या तारखेचे मॉडेल समाविष्ट केले आहेत हे स्पष्ट केलेले नाही. मारुती सुझुकीने एका नियामक फाइलिंगमध्ये या संदर्भात माहिती दिली आहे.

Advertisement

एक्सचेंज फाइलिंगनुसार, या वाहनांचे स्टीयरिंग गिअरबॉक्स असेंब्ली सदोष असल्याचे सांगण्यात आले आहे. याचा परिणाम वाहनाच्या स्टीयरिंग आणि हाताळणीवर होऊ शकतो. मारुतीने बाधित कार मालकांना सुटे भाग बदलेपर्यंत वाहने न चालवण्याचा सल्ला दिला आहे.

कोणतीही शुल्क आकारणी नाही

कंपनीने सांगितले की मारुती सुझुकीची अधिकृत विक्री केंद्रे संबंधीतांशी संपर्क साधेल. वाहनधारकांना सदोष भाग बदलण्याबाबत माहिती दिली जाईल. दोष दूर करण्यासाठी ग्राहकाकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. ग्राहक त्यांच्या वाहनाची तपासणी करण्यासाठी जवळच्या मारुती सुझुकी सेवा केंद्रालाही भेट देऊ शकतात.

दुसऱ्यांदा गाड्या मागवल्या

मारुती सुझुकीने या वर्षी दुसऱ्यांदा आपल्या गाड्या परत मागवल्या आहेत. यापूर्वी मार्च-2024 मध्ये, दोषपूर्ण इंधनपंप मोटरमुळे बलेनोच्या 11,851 युनिट्स आणि वॅगनआरच्या 4,190 युनिट्स परत मागवण्यात आल्या होत्या. कंपनीने या रिकॉलमध्ये 30 जुलै 2019 ते 1 नोव्हेंबर 2019 दरम्यान उत्पादित वाहनांसाठी दोष दर्शविला होता.

अशा प्रकारे तुमची कार तपासा

मारुती सुझुकीच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन आपण परत मागवलेल्या कारबद्दल जाणून घेऊ शकता. याशिवाय तुम्ही या लिंकवर क्लिक करून तुमच्या कारच्या चावीचे तपशील देखील तपासू शकता. मारुती बलेनो आणि वॅगनआर साठी रिकॉल लिंकवर क्लिक करा. यानंतर तळाशी ण्थ्घ्ण्ख् प्Rिंं चा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा. आता येथे तुम्हाला तुमच्या कारचा चेसिस नंबर लिहून तपासावा लागेल. तुमची गाडी दुरुस्त करायची असेल तर तुम्हाला येथून कळेल.

Advertisement
Tags :

.