कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

एप्रिलमध्ये कार विक्रीत मारुतीचीच आघाडी

06:54 AM May 06, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

ह्युंडाई चौथ्या स्थानावर : टाटाच्या विक्रीत नरमाई

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

बाजारातील आव्हानांचा सामना करत ऑटो कंपन्यांनी एप्रिलमधील वाहन विक्रीची आकडेवारी जाहीर केली असून यात मारुतीने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केलेले आहे. मागच्या महिन्यात मारुती सुझुकी व महिंद्रा आणि महिंद्रा यांच्या वाहन विक्रीत वाढ झाली होती तर दुसरीकडे टाटा मोटर्स व ह्युंडाई इंडिया यांच्या कार विक्रीत मात्र घसरण अनुभवायला मिळाली आहे.

महिंद्रा आणि टाटा मोटर्स या कंपन्या विक्रीच्या बाबतीत क्रमवारीत वर चढलेल्या दिसल्या. महिंद्रा दुसऱ्या तर टाटा तिसऱ्या क्रमांकावर होती. ह्युंडाई मोटर्स मात्र आश्चर्यचकीतरित्या चौथ्या नंबरवर घसरली आहे. सातत्याने ह्युंडाई दुसऱ्या नंबरवर ही कंपनी होती. मारुतीने एप्रिल महिन्यात कार विक्रीत 1 टक्के वर्षाच्या आधारावर वाढ दर्शवली असून पीव्ही आणि एलसीव्ही गटातील कारची विक्री कंपनीची 1 लाख 42 हजार 53 इतकी राहिली होती. आल्टो, एस्प्रेसो यांची विक्री 11,519 वरुन 6332 वर घसरली आहे. महिंद्राच्या युटिलीटी वाहनांची विक्री 28 टक्के वाढीसह 52,330 वर राहिली होती. टाटा मोटर्सच्या वाहन विक्रीत मात्र 6 टक्के घसरण दिसली असून 45,199 वाहनांची विक्री नोंदवलीय. ह्युंडाईने 44,374 कार्सची विक्री केलीय, जी 12 टक्के कमी आहे. किया इंडियाने 18 टक्के वाढीसह  23,623 वाहनांची विक्री केली होती.

आर्थिक वर्षातली कामगिरी

आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये 2 कोटी 6 लाख वाहनांची झाली आहे. वर्षाच्या आधारावर 6 टक्के विक्री वाढली असून दुचाकींचा विचार केल्यास आर्थिक वर्षात दुचाकी विक्री 1.88 कोटी इतकी राहिली आहे. वाढ 7 टक्के अधिक राहिली आहे. नवे आर्थिक वर्ष 2025-26 च्या पहिल्या महिन्यात देशात वाहनांची विक्री 22 लाखपेक्षा अधिक राहिली तर दुचाकी विक्री 16 लाखपेक्षा जास्त दिसून आली. एप्रिलमध्ये हिरोने 5 लाख 11 हजार दुचाकी विकल्या.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article