For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मारुती नवी स्विफ्ट सादर करण्याच्या तयारीत

07:00 AM May 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
मारुती नवी स्विफ्ट सादर करण्याच्या तयारीत
Advertisement

ऑनलाईन बुकिंगला सुरुवात : अत्याधुनिक सुविधांयुक्त मॉडेल बाजारात येणार

Advertisement

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

चारचाकी वाहन उत्पादक कंपनी मारुती सुझुकी 9 मे रोजी नवीन मारुती स्विफ्ट मॉडेल लॉन्च करू शकते. कंपनीने नवीन स्विफ्टचे ऑनलाइन बुकिंग सुरू केले आहे. कार खरेदीदार 11000 रुपये टोकन रक्कम भरुन हे मॉडेल बुक करू शकतो. मारुती सुझुकी स्विफ्ट ही भारतातील सर्वात आवडती हॅचबॅक कार आहे.  आता कारप्रेमींना त्याचे नवीन मॉडेल कितपत आवडते हे पाहायचे आहे. नवीन मारुती सुझुकी स्विफ्ट मॉडेलच्या किंमतीबद्दल बोलताना, उद्योग तज्ञांनी अंदाज वर्तवला आहे की या कारची किंमत 6 लाख 50 हजार ते 9 लाख 50 हजार रुपयांच्या घरात असू शकते. नवीन मारुती स्विफ्ट कार 1.2 लीटर झेड आवृत्ती थ्री-सिलेंडर पेट्रोल इंजिनसह सादर केली जाऊ शकते, जी सुरू केल्यावर, सुमारे 83 हॉर्स पॉवर आणि 112एनएम टॉर्क जनरेट करते. याशिवाय तुम्हाला मॅन्युअल ट्रान्समिशन आणि एएमटी गिअरबॉक्स पर्याय मिळू शकतो.

Advertisement

रंग पर्याय

2024 मारुती सुझुकी स्विफ्टचे नवे मॉडेल निळ्या, लाल, पांढऱ्या, चांदी, काळा आणि नारंगी रंगांसह ऑफर केले जाऊ शकते. नवीन मारुती स्विफ्टमध्ये नवीन एलईडी हेडलॅम्प्स आणि एलईडी टेल लॅम्पची सुविधा असेल. याशिवाय 16 इंच अलॉय व्हील, शार्क फिन अँटेना आणि रूफ स्पॉयलर पाहायला मिळतात.

Advertisement
Tags :

.