For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कामेरीच्या शुभम घाडगेला हौतात्म्य

03:33 PM Dec 26, 2024 IST | Radhika Patil
कामेरीच्या शुभम घाडगेला हौतात्म्य
Martyrdom of Shubham Ghadge of Kameri
Advertisement

देशमुखनगर : 

Advertisement

जम्मू कश्मीरमधील पूंछ भागातील नियंत्रण रेषेजवळ बलनोई परिसरात मंगळवारी संध्याकाळी भारतीय लष्कराचे वाहन खोल दरीत कोसळून झालेल्या अपघातात 5 जवान हुतात्मा झाले. त्यामध्ये 11 मराठा रेजिमेंटमध्ये देशसेवा करणारे कामेरी (ता. जि. सातारा) गावचे सुपूत्र शुभम समाधान घाडगे (वय : 28) यांना देशसेवा बजावत असताना हौतात्म्य आले. दरम्यान, गुरुवारी कामेरी येथे पार्थिव येणार असून दुपारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. शुभमच्या पश्चात आई-वडील, पत्नी, मुलगी, भाऊ असा परिवार आहे.

शुभमचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कामेरी येथे झाले आहे. माध्यमिक शिक्षण शंकरराव आनंदराव घाडगे विद्यालय येथे तर महाविद्यालयीन शिक्षण छत्रपती शिवाजी कॉलेज अपशिंगे मि. येथे होऊन पुढे तो लष्करात भरती झाला. दोन वर्षे लष्करात सेवा केल्यानंतर त्याला वीरमरण आले.

Advertisement

शुभम यांच्या जाण्याने कामेरी गावासह पंचक्रोशी व संपूर्ण जिह्यात हळहळ व्यक्त होत आहे. संपूर्ण कामेरी गाव आपल्या सुपूत्राला आलेल्या वीरमरणामुळे सुन्न झाले आहे.

Advertisement
Tags :

.