For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मार्टिन अल्मेडा यांची राज्य संघटनेवर समिती सदस्य म्हणून नियुक्ती

05:33 PM Jun 14, 2025 IST | अनुजा कुडतरकर
मार्टिन अल्मेडा यांची राज्य संघटनेवर समिती सदस्य म्हणून नियुक्ती
Advertisement

सावंतवाडी -

Advertisement

सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशनचे खजिनदार ,तज्ञ प्रशिक्षक तथा माजी कबड्डीपट्टू मार्टिन आल्मेडा यांची 18 वर्षाखालील पहिल्या राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेकरिता निवड समिती सदस्य म्हणून राज्य कबड्डी संघटनेकडून नियुक्ती करण्यात आली आहे .सदर स्पर्धा दि १४ ते १८ जून या कालावधीत पुणे बालेवाडी येथे राज्य संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेली आहे . मार्टिन अल्मेडा हे कॅथलिक बँकेचे सेक्रेटरी असून ते सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशनच्या वतीने गेली पंचवीस वर्षे कबड्डी प्रशिक्षक म्हणून जिल्ह्यात कार्यरत आहेत . त्यांनी हॉली क्रॉस मंडळाची स्थापना करून मुला मुलींचे संघ तयार केले आहेत. ते सतत मैदानात उपस्थित राहून खेळाडूना प्रशिक्षित करणे हा त्यांचा छंद आहे. .आजपर्यंत अनेक राज्य व राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू घडविले आहेत .त्यापैकी अनेक खेळाडू आज पोलीस दल,सैन्य दल, इतर कंपन्या तसेच अनेक शासकीय कार्यालयात काम करत आहेत . कोकण रेल्वेच्या कबड्डी संघाचे त्यांनी प्रशिक्षक पद सुद्धा भुषविलेले आहे .सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक वर्षे निवड समिती सदस्य म्हणून काम करत असताना राज्यस्तरावर सुद्धा त्यांनी निवड समिती वर उत्कृष्ट काम केलेले आहे. त्यांच्या या योगदानाचा विचार करून मार्टिन आल्मेडा यांची राज्यस्तरावर निवड समिती सदस्य म्हणून निवड करण्यात आलेली आहे . त्यांच्या या निवडीबद्दल सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशनच्या वतीने व खेळाडूंच्या वतीने कार्यवाह दिनेश चव्हाण यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या . सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशनचे अध्यक्ष श्री रुजारीओ पिंटो, उपाध्यक्ष ॲड अजित गोगटे , दिलीप रावराणे , तुषार साळगावकर , कार्याध्यक्ष संजय पेडणेकर व अन्य पदाधिकाऱ्यांनी, पंच व कार्यकर्त्यांनी श्री आल्मेडा यांचे अभिनंदन केले.

Advertisement
Advertisement
Tags :

.