Sangli Crime| जतमध्ये विवाहितेचा छळ! सहा तोळे सोने घेतले; पतीसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल.
जत शहरात विवाहित महिलेला मानसिक व शारीरिक त्रास देऊन सोने लुटले
जत -जत शहरातील एका विवाहित महिलेस शारीरिक मानसिक त्रास देऊन सहा तोळे सोने घेतले प्रकरणी तसेच मुलीचा संभाळ न केल्याने पती, सासू, नणंद व नणंदच्या पतीसह पाच जणा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद मूळच्या संख येथील गिरीजा राजेंद्र पाटील (वय ३६), (सध्या रा. अंबिकानगर जत) यांनी जत पोलिसात दिली आहे. पोलिसांनी पती राजेंद्र आप्पासाहेब पाटील, सासु सरुबाई (शांता) आप्पासाहेब पाटील, नंणद सुजाता मल्लिकार्जुन बिराजदार, ननंदचे पती मल्लिकार्जुन बिराजदार व नातेवाईक विजय हणमंतराय बिराजदार सर्व (रा. संख) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
विवाहित गिरीजा पाटील यांचे पती राजेंद्र पाटील सासू सरुबाई पाटील, नणंद सुजाता बिराजदार, नणंदचे पती मल्लिकार्जुन बिराजदार आणि नातेवाईक विजय बिराजदार यांनी त्यांना मानसिक व शारीरिक त्रास दिला आहे. गिरीजा यांच्या तक्रारीनुसार, या पाच जणांनी १५ मे २०२५ पासून २ फेब्रुवारी २०२६ पर्यंत शारीरिक व मानसिक त्रास केला आहे. यामध्ये, पती राजेंद्र पाटील, सासु सरुबाई (शांता) पाटील, ननंद सुजाता मल्लिकार्जुन बिराजदार, मल्लिकार्जुन बिराजदार व विजय हणमंतराय बिराजदार यांच्याकडून गिरीजा पाटील यांना शिवीगाळ, दमदाटी आणि लाथाबुक्यांनी मारहाण करण्यात आली. एप्रिल २०२५ मध्ये गिरीजा पाटील यांनी पती राजेंद्र पाटील यांना घेऊन येण्यासाठी प्रयत्न केले असता, विजय हणमंतराय बिराजदार याने गिरीजा पाटील यांना शिवीगाळ केली आणि गाडीवरील ड्रायव्हरला मारहाण केली.