For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पंधरा लाखासाठी विवाहितेचा छळ; पतीसह सहाजणांविरुद्ध गुन्हा

12:52 PM Jun 24, 2026 IST | RAHUL SADOLIKAR
पंधरा लाखासाठी विवाहितेचा छळ  पतीसह सहाजणांविरुद्ध गुन्हा
Advertisement

आमच्या मुलाला पळवून नेऊन लग्न केले

Advertisement

सोलापूर : मुलासाठी तसेच १५ लाख रुपयांसाठी विवाहितेचा छळ करणाऱ्या पतीसह सहाजणांविरुद्ध फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत प्रतिक्षा प्रतिक सोनटक्के (रा. नाकोडा युनिटी, फ्लॅट नं. ४९/ए/२६, ७ वा मजला, पद्मिनी नरसिंग होमजवळ, सोलापूर) या विवाहितेच्या फिर्यादीवरुन पती प्रतिक, सासू तेजस्वी, सासरे नितीन, चुलत सासू उर्मिला, मामी सासू दीपाली, नणंद पायल (रा. इंदापूर, जि. पुणे) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

Advertisement

१२ डिसेंबर २०२४ ते ७ मे २०२६ या कालावधीत प्रतिक्षा ही सासरी नांदण्यास होती. त्यावेळी पती व घरातील लोकांनी मिळून प्रतिक्षा हिस लग्नात हुंडा, पैसा, सोने दिले नाही. आमच्या मुलाला पळवून नेऊन लग्न केले, मुलाचे आयुष्य खराब केले आहे, तू फुकट घरात आली, घरातील कामे येत नाहीत.

आम्हांला मुलगा पाहिजे होता, तू मुलीला जन्म दिला आहे. व्यवसायासाठी माहेरहून १५ लाख रुपये घेऊन आली नाही तर तू नांदायला येऊ नको म्हणून त्रास दिला. याबाबत फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. हवालदार पवार तपास करीत आहेत.

Advertisement
Tags :

.