Miraj Crime News | १४ वर्ष सहन केलं, पण 'त्या' दिवशी संयम सुटला! विवाहितेच्या आत्महत्येने अनेक प्रश्न उपस्थित
१४ वर्षांच्या छळाला कंटाळून विवाहितेने संपवले जीवन
मिरज: माहेरकडील संपत्तीतहिस्सा मिळवून देण्यासाठी गेल्या १४ वर्षांपासून पतीसह सासरच्या लोकांनी शारीरिक व मानसिक छळ केल्यामुळे विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या करुन जीवन संपविल्याची धक्कादायक घटना तालुक्यातील आरग येथे उघडकीस आली आहे.
निलावती महादेव सटाले (वय ३५) असे मयत महिलेचे नांव आहे. याबाबत तिच्या माहेरच्या नातेवाईकांनी मिरज ग्रामीण पोलिसात धांव घेतल्यानंतर पतीसह चौघांबर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये संशयीत पती महादेव नायकू सटाले, सासू भागुबाई नायकु सटाले, सासरा नायकु बंडू सटाले, दिर बाबासाहेब नायकु सटाले अशा चौघांचा समावेशआहे.
संबंधीतांनी विवाहितेचा मानसिक व शारिरीक छळ करुन तिला माहेरकडे जाण्यास बंदी केली होती. सासरच्या लोकांकडून अपमानास्पद वागणूक मिळत असल्याने विवाहितेने आत्महत्या केल्याचे पोलिस तपासातून समोर आले आहे आरगेतील बेळंकी रस्त्यावर माळवाडी येथे निलावती सटाले यांचा महादेव सटाले याच्याशी १४ वर्षापूर्वी विवाह झाला होता. विवाहितेच्या माहेरकडील बडीलोपार्जीत संपत्तीत बाटा मिळवून देण्यासाठी सासरच्या लोकांनी दबाव आणला. मात्र माहेरकडील संपत्तीत वाटा न मिळाल्याने सासरच्या लोकांनी माहेरकडे जाण्यास बंदी केली. वारंवार शारिरीक व मानसिक त्रास देऊन सार्वजनिक ठिकाणी अपमानी करण्याचे प्रकार सुरू होते.