प्रियकरासोबत विवाहबद्ध प्राजक्ता
13 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये
अभिनेत्री प्राजक्ता कोळीने अनेक वर्षांपर्यंत वृषांक कनालला डेट केल्यावर आता विवाह केला आहे. यामुळे प्राजक्ताचे चाहते आनंदून गेले आहेत. साखरपुडा केल्याच्या दोन वर्षांनी या जोडप्याने विवाह केला आहे.
प्राजक्ता कोळीने 25 फेब्रुवारी रोजी वृषांकसोबत विवाह केला आहे. एक युट्यूबर आणि कंटेंट क्रिएटर ते बॉलिवूड अभिनेत्री असा प्रवास केलेल्या प्राजक्ताने वृषांकने माझ्यासाठी रिंग आणणे माझ्यासाठी अत्यंत सुंदर अनुभव असल्याचे तिने यापूर्वी म्हटले होते.
वृषांक हा मूळचा नेपाळचा असून काठमांडू शहर मला अत्यंत आवडते. वृषांक हा एक वकील असून तो इन्व्हेस्टमेंट बँकमध्ये काम करतो अशी माहिती प्राजक्ताने दिली आहे. प्राजक्ता आणि वृषांक हे मागील 13 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. प्राजक्ता आणि वृषांकसाठी हा कालावधी अत्यंत उतारचढावयुक्त राहिला आहे, परंतु दोघांमधील प्रेम या अडथळ्यांवर मात करत बहरत गेले आहे. प्राजक्ताने कारकीर्दीची सुरुवात रेडिओ जॉकी म्हणून केली होती. प्राजक्ताचे नाव 2019 मध्ये फोर्ब्सच्या 30 अंडर 30 च्या यादीतही सामील झाले होते.