For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बाहुलीसोबत विवाह

06:02 AM Jun 25, 2026 IST | Tarun Bharat Portal
बाहुलीसोबत विवाह
Advertisement

मग पतीवरच विश्वासघाताचा आरोप

Advertisement

ब्राझीलच्या मेइरीवोने रोचा मोराएसने अनोखा विक्रम स्वत:च्या नावावर केला आहे. तिने कपड्याच्या एका मोठ्या बाहुलीसोबत विवाह केला आणि आता याच बाहुलीवर विश्वासघाताचा आरोप करत ती प्रसिद्धी मिळवित आहे. मेइरीवोनेच्या आईने तिच्यासाठी एक लाइफ साइज रॅग डॉल तयार केला होता, याला तिने मार्सेलो नाव दिले होते.

महिलेने यालाच स्वत:चा पती मानले आणि सर्व विधींसह विवाहही केला. या विवाहसोहळ्यात शेकडो पाहुणे सामील झाले होते. सोशल मीडियावर याची छायाचित्रे अन् व्हिडिओ व्हायरल झाले होते. मार्सेलो माझ्या जीवनाचा महत्त्वाचा हिस्सा असून मी त्यावर अत्यंत प्रेम करते असा दावा मेइरीवोने हिने केला होता. काही काळानंतर मेइरीवोनेला कथित दोन अपत्यंही झाली होती.

Advertisement

रॅग डॉल ठरला विश्वासघाती

दांपत्याची अपत्यंत बाहुल्यांसारखीच होती, परंतु महिला त्यांना स्वत:चा मुलगा-मुलगी ठरवत राहिली. पूर्ण जगाने या अनोख्या परिवाराला पाहिले आणि सोशल मीडियावर मीम्स, कॉमेंट्स आणि चर्चेचा पूर आला. काही लोक याला मूर्खपणा मानत होते, तर काही जण याला लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न ठरवत होते. परंतु यानंतर कहाणीत नवा ट्विस्ट आला.

जेव्हा मी काही दिवसांसाठी रुग्णालयात भरीत होते, तेव्हा माझा पती ‘मार्सेलो’ने विश्वासघात केला, तो दुसऱ्या महिलेसोबत दिसून आल्याचे मेइरीवोनेचे सांगणे आहे. तिने रागात मार्सेलोला शिक्षा देत सोफ्यावर झोपण्यास सांगितले. सोशल मीडियावर पोस्ट करत तिने पूर्ण घटना शेअर केली आहे. या पोस्टनंतर पुन्हा तिचे फॉलोअर्स वाढले असून कहाणी पुन्हा व्हायरल झाली आहे.

प्रेम का मूर्खपणा?

हे प्रकरण एकाकीपणा, इमोशनल अटॅचमेंट आणि फँटसी वर्ल्डशी निगडित असू शकतो असे मनोवैज्ञानिकांचे सांगणे आहे. खऱ्या माणसांकडून माझा विश्वास मोडला गेला होता, याचमुळे मी बाहुलीला स्वत:चा जोडीदार पेले. बाहुला माझ्यासाठी सुरक्षा अन् सोबतीचा प्रतीक ठरला असे मेइरीवोनेचे सांगणे आहे. मार्सेलो माझा पती असून मे हे नाते जारी ठेवणार असल्याचे तिने म्हटले आहे.

Advertisement
Tags :

.