चहाच्या गोडव्यामुळे ठरतो विवाह
साखरेमुळे मिळते मंजुरी
भारतात सर्वसाधारणपणे दिवसाची सुरुवात चहाने होते. तसेच जर कुणाला चहा मिळाला नाही तर दिवस अपूर्ण वाटू लागतो. परंतु एका देशात चहाच्या गोडव्याद्वारेच विवाह ठरत असतो. चहाच्या गोडव्यानंतर युवक-युवतीचा विवाह निश्चित होतो. भारताच्या बहुतांश लोकांच्या दिनचर्येत चहा सामील आहे. याशिवाय दिवसच अपूर्ण मानला जातो. भारतात जर कुठल्याही घरात गेला तर सर्वसाधारणपणे चहा घ्याल का अशी विचारणा केली जाते. भारताप्रमाणेच अन्य काही देशांमध्ये चहावरून एक वेगळीच आत्मियता जोडलेली आहे. तर एक देश असा आहे जेथे चहाच्या गोडव्यातूनच विवाह जमून येत असतो.
भारत हा चहा पिण्यात नव्हे तर त्याच्या उत्पादनातही जगातील अग्रगण्य देशांमध्ये सामील आहे. भारतातील आसाम, नीलगिरी आणि दार्जिलिंग चहा पूर्ण जगात प्रसिद्ध आहे. भारतासोबत चीन आणि केनिया, श्रीलंकाही चहा उत्पादनात आघाडीवर आहेत. अझरबैजानमध्ये चहाच्या गोडव्यावर विवाह ठरत असतो. अझरबैजानमध्ये चहाची चवच कुठलाही पुरुष स्वत:च्या पसंतीच्या महिलेसोबत विवाह करणार की नाही ठरवत असते. जेव्हा एखाद्या पुरुषाचे आईवडिल विवाहासाठी युवतीचा हात मागण्यासाठी तिच्या घरी जातात, तेव्हा युवतीचे आईवडिल तिला ‘शिरीन चाय’ नावाचा गोड चहा देत आशीर्वाद देतात. याचा अर्थ विवाहाची तयारी सुरू होऊ शकते. जर त्यांनी असे केले नाही तर विवाह ठरला नसल्याचे मानले जाते.
चहाचा इतिहास
चहाच्या शोधाचा संबंध चीनशी असल्याचे मानले जाते. चीनचा एक शासक शेन नंगला त्याच्या आविष्काराचे श्रेय दिले जाते. परंतु चहाचा शोध हा आकस्मिक स्वरुपाचा होता. सुमारे 4800 वर्षांपूर्वी म्हणजेच ख्रिस्तपूर्व 2732 साली चहा हा एक पेयपदार्थ म्हणून लोकांना माहिती मिळाली होती.