लग्नाचा बायोडाटा चक्क रस्त्त्याच्या कि.मी.दगडावर..!
लग्न ठरण्यासाठी नवरदेवाची शक्कल
बायोडामध्ये स्थावर व जंगम मालमत्तेचा उल्लेख
कोल्हापूरः
सध्याच्या कालखंडात लग्न ठरविणे अवघड काम झाले आहे. अनेक वधुवर सुचक मंडळांना बायोडाटा पाठवून ही म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही. म्हणूनच एका इच्छुक नवरदेवाने चक्क रस्त्यांचे अंतर दर्शविणाऱ्या कि.मी.च्या दगडावर ठिकठिकाणी स्वताचा बायोडाटा लावला आहे. त्यामुळे लग्न जुळण्यासाठी नामी शक्कल लढविणाऱ्या, या इच्छुक नवरदेवाची चर्चा रंगली आहे.
लग्नाच्या गाठी विधीलिखीत असतात असे म्हटले जाते. परंतु सध्याच्या जमान्यामध्ये हा विधीलिखीतचा फेरा कुठे चुकलाय असे म्हणण्याची वेळ लग्न जमत नसलेल्या वधू वरासह त्यांच्या कुटुंबियांवर आली आहे.
मुलगा उच्च शिक्षित,नोकरदार तसेच त्याची कौटुंबिक परिस्थिती चांगली असताना ही त्याला लग्न ठरविताना चांगलीच कसरत करावी लागते. लग्न जुळविण्यासाठी तो वधुवर सुचक मंडळांच्या अनेक चकरा मारतो. सोशलमिडीयावरील अनेक संकेतस्थळावर ही आपला बायोडाटा पाठवून बरेच दिवस त्या संकेतस्थळावरून प्रतिसाद येईल काय याची वाट पहात राहतो. तर नातेवाईकांना आपले लग्न जुळविण्यासाठी विनवणी करावी लागत आहे. या सगळ्या गोष्टी करूनही लग्न ठरत नसल्याने अनेक जण लग्नाच्या विवेचनेत पडले आहेत.
आशातच एका इच्छुक नवरदेवाने चक्क गारगोटी -कोल्हापूर रोडवरील कूर या बाजारपेठेच्या मुख्य रस्त्यावरील अंतर दर्शविणाऱ्या कि.मी.च्या दगडावरच आपल्या संपूर्ण माहिती चा बायोडाटा पाठवला आहे. यामध्ये त्यांनी आपली पुणे येथील इंजिनीअर नोकरी मिळवित असलेला ८ लाखांचा पगार व पुणे येथे टू बेच के फ्लँट व आपली असणारी स्थावर मालमत्ता आणि वधु संबधीच्या अपेक्षा या सर्व बाबींचा उल्लेख केला आहे. शिवाय संपर्कासाठी आपला मोबाईल नंबर ही दिला आहे.