महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

भारतीय फुटबॉल संघाचे नवे प्रशिक्षक मारक्वेझ

06:00 AM Jul 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

नवी दिल्ली : भारतीय पुरूष फुटबॉल संघाच्या प्रमुख प्रशिक्षकपदी स्पेनचे मॅनोलो मारक्वेझ यांची नियुक्ती केल्याची घोषणा अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनतर्फे शनिवारी करण्यात आली. यापूर्वी भारतीय संघाचे प्रशिक्षकपद इगोर स्टिमॅक यांच्याकडे होते. पण स्टिमॅक यांची प्रशिक्षक पदावरून उचलबांगडी करण्यात आल्याने त्यांच्या जागी मारक्वेझ यांची नवे प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. स्पेनच्या मारक्वेझ यांच्याकडे इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेत खेळणाऱ्या एफसी गोवा संघाचे प्रमुख प्रशिक्षकपदाची धुरा यापूर्वीच सोपविण्यात आली होती. 55 वर्षीय मारक्वेझ यांच्या प्रमुख प्रशिक्षकपदाच्या नियुक्तीला अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनच्या कार्यकारी समितीच्या शनिवारी झालेल्या बैठकीत एकतर्फी निर्णय घेण्यात आला. आता भारताच्या राष्ट्रीय फुटबॉल संघाची जबाबदारी मारक्वेझ यांच्यावर सोपविण्यात आली आहे. आता मारक्वेझ यांच्याकडे भारतीय फुटबॉल संघाचे तसेच एफसी गोवा संघाची दुहेरी जबाबदारी राहील.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article