महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

बाजार कोसळला, सेन्सेक्स 793 अंकांनी घसरणीत

06:10 AM Apr 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मॉरिशसमधील बातमीचा परिणाम : निफ्टीतील सर्व निर्देशांक नुकसानीत

Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

Advertisement

शुक्रवारी आठवड्याच्या शेवटच्यादिवशी भारतीय शेअरबाजार मोठ्या घसरणीसह बंद झालेला पहायला मिळाला. मॉरिशस व भारत यांच्यातील विदेशी गुंतवणुकीसंदर्भातील पेचासंबंधीच्या बातमीने भारतीय शेअर बाजारावर नकारात्मक परिणाम दिसून आला. सेन्सेक्स 793 तर निफ्टी 234 अंकांनी घसरणीत राहिला.

शुक्रवारी सरतेशेवटी मुंबई शेअर बाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 793 अंकांनी घसरुन 74244 अंकांवर बंद झाला तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक 234 अंकांनी घसरुन 22519 अंकांवर बंद झाला होता. मॉरिशसमधून होणाऱ्या विदेशी गुंतवणूकदारांच्या बाबतीमध्ये तपास केला जाणार असल्याचे समजताच त्याचा परिणाम शेअर बाजारावर दिसून आला. तेथील विदेशी गुंतवणुकदारांनी ब्ल्यूचिप समभागांमध्ये आपली हिस्सेदारी कमी केल्याने भारतीय शेअर बाजारामध्ये 800 अंकांपेक्षा जास्त घसरण अनुभवायला मिळाली. निफ्टीमध्ये सर्व क्षेत्रांचे निर्देशांक लाल निशाण्यासह बंद झाले होते. बँक, फार्मा आणि फायनान्शीयल सर्व्हिसेस यांचे निर्देशांक एक टक्क्यांपेक्षा अधिक घसरले होते.

डीव्हीज लॅब्ज, बजाज ऑटो, टाटा मोटर्स, टीसीएस, नेस्ले इंडिया आणि कोल इंडिया यांचे समभाग तेजीसमवेत बंद झाले. दुसरीकडे सनफार्मा, मारुती सुझुकी, पॉवरग्रीड कॉर्प, टायटन, ओएनजीसी, ग्रासिम इंडस्ट्रीज आणि जेएसडब्ल्यू स्टील यांचे समभाग घसरणीत दिसून आले. सनफार्माचे समभाग 4 टक्के तर मारुती व पॉवरग्रीडचे समभाग 3 टक्के घसरणीत राहिले. मल्टीबॅगर श्रेणीतील कोटक महिंद्रा बँक, एचडीएफसी बँक, विप्रो, एचसीएल टेक, एशियन पेंटस्, इन्फोसिस यांचे समभाग घसरणीत राहिले.

अदानी समुहातील 10 पैकी 9 कंपन्यांचे समभाग घसरणीसोबत बंद झाले. अदानी एनर्जी सोल्युशन या कंपनीचा समभाग निव्वळ तेजीत होता. सेन्सेक्स निर्देशांकातील 30 पैकी 20 समभागात घसरण होती तर 10 समभागांमध्ये तेजी पहायला मिळाली. भारती एअरटेल या दूरसंचार क्षेत्रातील कंपनीची सहकारी कंपनी भारती हेक्साकॉम लिमीटेडचा समभाग शुक्रवारी 32 टक्के वाढीसह शेअर बाजारात सूचीबद्ध झाला. बीएसईवर सदरचा समभाग 755 रुपयांवर लिस्ट झाला होता. 542-570 रुपये प्रति समभाग अशी आयपीओअंतर्गत किंमत निश्चित करण्यात आली.

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article