दमदार तेजीने बाजाराची आठवड्याची सुरुवात
सेन्सेक्स 650 अंकांनी तेजीत : बँकिंग निर्देशांक चमकला
वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय शेअर बाजाराची सोमवारी आठवड्याची सुरुवात चांगल्या तेजीसह झालेली दिसून आली. सेन्सेक्स 650 अंकांनी वधारला होता, ज्यात बँकिंग समभागांची सकारात्मक कामगिरी कामी आली. एनर्जी, रिअल्टी व पीएसइ निर्देशांकही चांगल्या तेजीसह बंद झाले.
सोमवारी आठवड्याच्या पहिल्या दिवशी सरतेशेवटी मुंबई शेअरबाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 650 अंकांनी वधारत 83277 अंकांवर बंद झाला तर दुसरीकडे 50 समभागांचा समावेश असणाऱ्या निफ्टी निर्देशांकानेही 212 अंकांनी तेजी राखत 25682 अंकांवर बंद होण्यात यश मानले.
हे समभाग वधारले
शेअरबाजारात पाहता पॉवरग्रिड कॉर्प, कोल इंडिया, अदानी एंटरप्रायझेस, अॅक्सिस बँक, मॅक्स हेल्थकेअर, आयटीसी, ओएनजीसी, एनटीपीसी, श्रीराम फायनान्स, जेएसडब्ल्यू स्टील, रिलायन्स, अपोलो हॉस्पिटल, टाटा स्टील, भारती एअरटेल, कोटक महिंद्रा बँक, हिंदुस्थान युनिलिव्हर, टीसीएस, नेस्ले इंडिया, इंडिगो, एसबीआय लाइफ, इटर्नल, टायटन, सनफार्मा, अल्ट्राटेक सिमेंट यांचे समभाग तेजीसह बंद झाले. मिडकॅपमध्ये जीएमआर एअरपोर्टस्, अरोबिंदो फार्मा, एल अँड टी फायनान्स, सुप्रीम इंडस्ट्रिज, डिक्सन टेक्नॉलॉजी, इरेडा यांचे समभागही तेजीत होते.
हे समभाग घसरले
दुसरीकडे नकारात्मक कामगिरी करणाऱ्या समभागांमध्ये हिंडाल्को, आयसीआयसीआय बँक, विप्रो, ट्रेंट, जियो फायनान्स, बजाज ऑटो, महिंद्रा आणि महिंद्रा, आयशर मोटर्स, टाटा मोटर्स पीव्ही, मारुती सुझुकी, टेक महिंद्रा यांचा समावेश होता. मिडकॅप निर्देशांकातील बीएसई लिमिटेड, अपोलो टायर्स यांचे समभागही कमकुवत होत बंद झाले.
विविध निर्देशांकाची कामगिरी
विविध निर्देशांकांच्या कामगिरीकडे पाहता फक्त ऑटो निर्देशांक कमकुवत होत बंद झाला. सीपीएसई, आयटी, इन्फ्रा, ऑईल अँड गॅस, मेटल, फार्मा, रिअल्टी यांच्या निर्देशांकांनी तेजी राखली.