For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बाजाराची आठवड्याची सुरुवात तेजीने

06:06 AM Feb 24, 2026 IST | Tarun Bharat Portal
बाजाराची आठवड्याची सुरुवात तेजीने
Advertisement

सेन्सेक्स 479 तेजीत, जागतिक बाजारात उत्साह

Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

जागतिक सकारात्मक वातावरणात भारतीय शेअर बाजारही सोमवारी आठवड्याच्या पहिल्या दिवशी तेजीसमवेत बंद होताना दिसला. सेन्सेक्स जवळपास 479 अंकांनी तर निफ्टी 141 अंकांनी वाढत बंद झाला. पीएसयू बँक आणि वित्तसेवा क्षेत्रातील समभागांच्या तेजीमुळे शेअरबाजाराला भक्कम आधार मिळाला.

Advertisement

सोमवारी सरतेशेवटी मुंबई शेअरबाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 479 अंकांनी वाढत 83294 अंकांवर बंद झाला. दुसरीकडे 50 समभागांचा राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक 141 अंकांनी वाढत 25713 अंकांवर बंद झाला.

समभागांची कामगिरी

समभागांच्या कामगिरीकडे पाहिल्यास अदानी पोर्ट, कोटक महिंद्रा, डॉ. रे•ाrज लॅब्ज, टाटा कंझ्युमर्स, नेस्ले, अल्ट्राटेक सिमेंट, आयशर मोटर्स, ग्रासिम, अदानी एंटरप्रायझेस, अॅक्सिस बँक, एचयूएल, भारती एअरटेल, लार्सन टूब्रो, एनटीपीसी, इंडिगो, जेएसडब्ल्यू स्टील, आयसीआयसीआय बँक, रिलायन्स, एशियन पेंटस्, बजाज फायनान्स आणि सनफार्मा यांचे समभाग तेजीसमवेत बंद झाले. मिडकॅप निर्देशांकात इंडियन बँक,  कमिन्स, भारत फोर्ज आणि जेएसडब्ल्यू इन्फ्रा यांचे समभाग मजबूत होत बंद झाले. घसरणीमध्ये पाहता टाटा स्टील, जीओ फायनान्स, टीसीएस, आयटीसी, इटर्नल, एचसीएल टेक, विप्रो, सिप्ला, ओएनजीसी, इन्फोसिस, ट्रेंट, हिंडाल्को, बीईएल यांचे समभाग कमकुवत होत बंद झाले.

निर्देशांकांची कामगिरी पाहिल्यास आयटी, मेटल आणि रियल्टी हे निर्देशांक नकारात्मक कामगिरी करत बंद झाले. अमेरिकेसोबतच्या व्यापारशुल्कासंदर्भातील तणावाच्या पार्श्वभुमीवर आयटी निर्देशांक 453 अंकांनी घसरत 31550 अंकांवर बंद झाला. इतर निर्देशांकात ऑटो, कमोडिटीज, सीपीएसई, एनर्जी, फायनान्सीयल्स, एफएमसीजी, फार्मा, इन्फ्रा, ऑईल आणि गॅस  यांचे निर्देशांक तेजीसमवेत बंद झाले.

Advertisement
Tags :

.