For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तिसऱ्या सत्रात बाजारात तेजीची झुळूक

06:43 AM Dec 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
तिसऱ्या सत्रात बाजारात तेजीची झुळूक
Advertisement

सेन्सेक्स 16 तर निफ्टी 31.75 अंकांनी वधारले

Advertisement

मुंबई :

चालू आठवड्यातील तिसऱ्या सत्रात बुधवारी भारतीय भांडवली बाजारात दिवसभरातील कामगिरीनंतर दिवसअखेर बीएसई सेन्सेक्स व एनएसई निफ्टी यांचे निर्देशांक तेजीची झुळूक प्राप्त करुन बंद झाले. निफ्टी 32 अंकांनी वाढून  बंद झाला, तर सेन्सेक्स 16.09 अंकांनी वाढून बंद झाला. त्याचवेळी आज सकाळपासूनची सुरुवात काहीशा तेजीने झाली. आजच्या ट्रेडिंग सत्रात निफ्टी एफएमसीजी, निफ्टी ऑटो आणि निफ्टी आयटीने चांगला फायदा नोंदवला, तर बँकिंग क्षेत्रात घसरण झाली. दिग्गज कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 16.09 अंकांनी वधारुन निर्देशांक 81,526.14 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजारचा निफ्टी हा दिवसअखेर 31.75 अंकांच्या तेजीसोबत निर्देशांक 24,641.80 वर बंद झाला आहे.

Advertisement

बुधवारी बजाज फायनान्सचा शेअर 2.58 टक्क्यांनी वाढून 7,115 वर बंद झाला, तर बजाज फिनसर्व्ह 1.39 टक्क्यांच्या वाढीसह 1,686 वर बंद झाला. त्यानंतर, इन्फोसिसचे समभाग 1.32 टक्क्यांनी बंद झाले, तर अल्ट्राटेक सिमेंटचे समभाग 1.31 टक्क्यांनी तेजीत राहिले. तसेच, नेस्ले इंडियाचे समभाग 1.21 टक्क्यांच्या वाढीसह 2,241 वर बंद झाले.  जेएसडब्लू स्टीलच्या समभागांमध्ये सर्वात मोठी घसरण नोंदवली गेली, जी 1.26 टक्क्यांनी घसरून 1,000 पातळीवर बंद झाली, तर अदानी पोर्ट 1.20 टक्क्यांनी घसरून 1,234 पातळीवर बंद झाला. नंतर, एनटीपीसीचे समभाग 0.99 टक्क्यांनी घसरून बंद झाले तसेच, अॅक्सिस बँकेचे समभाग 0.56 टक्क्यांच्या तेजीसोबत 1,147 वर बंद झाले.

क्षेत्रांची कामगिरी

निफ्टी एफएमसीजी निर्देशांक 0.42 टक्क्यांनी, निफ्टी ऑटो 0.36 टक्क्यांच्या वाढीसह 23,852 वर बंद झाला. यानंतर निफ्टी आयटी 0.33 टक्क्यांनी वाढून 45,350 च्या पातळीवर बंद झाला. त्याचवेळी बँकिंग क्षेत्रातील सर्वच क्षेत्रात घसरण दिसून आली.  बँक निफ्टी 0.35 टक्क्यांनी प्रभावीत होत बंद झाला,  घसरून 53,391 वर बंद झाला, तर झ्एळ बँक निफ्टी 0.89ज्ञ् घसरून 7,089 वर बंद झाला.

Advertisement
Tags :

.