जागतिक संकेतामुळे बाजार तेजीत
सेन्सेक्स 115 अंकांनी वधारला : सलग दुसऱ्या सत्रात तेजीचा कल
वृत्तसंस्था/मुंबई
भारतीय भांडवली बाजारात चालू आठवड्यातील चौथ्या सत्रात गुरुवारी जागतिक बाजारातील मजबूत ट्रेंडमुळे सलगचे तेजीचे सत्र राहिले. दरम्यान ऑटो, आयटी, सिमेंट आणि निवडक आरोग्यसेवा या क्षेत्रांमधील समभागांमध्ये वाढ झाल्यामुळे शेअर बाजार तेजीसह बंद झाला आहे. तथापि, देशांतर्गत कंपन्यांचे डिसेंबर तिमाहीतील कमकुवत निकाल आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या शुल्क वाढविण्याच्या योजनेमुळे बाजारातील तेजीला मात्र मर्यादा प्राप्त झाल्याचे दिसून आले. मुख्य कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स गुरुवारी 10 अंकांनी वाढून 76,414.52 वर खुला झाला आहे. व्यवहारादरम्यान तो 76,202 अंकांवर घसरला होता. परंतु दिवसअखेर बीएसई, सेन्सेक्स 115.39 अंकांच्या तेजीसोबत निर्देशांक 0.15 टक्क्यांसह 76,520.38 वर बंद झाला. तसेच दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजारचा निफ्टी देखील 23,200 ची मानसिक पातळी ओलांडून 50 अंकांच्या तेजीसह निर्देशांक 0.22 टक्केच्या वाढीसह 23,205.35 वर बंद झाला.
तेजीमधील कंपन्या
सेन्सेक्समधील कंपन्यांमध्ये अल्ट्राटेक सिमेंट्स 7 टक्क्यांनी वधारले. झोमॅटो, महिंद्रा अँड महिंद्रा, सनफार्मा, टेक महिंद्रा, टाटा मोटर्स, टायटन, टाटा स्टील, आयटीसी, बजाज फायनान्स आणि एशियन पेंट्सचे समभागही मोठ्या प्रमाणात वधारले. दुसरीकडे, पॉवर ग्रिड सर्वात मोठ्या घसरणीसह बंद झाला. याशिवाय, कोटक बँक, एचसीएल टेक, रिलायन्स इंडस्ट्रीज, एसबीआय, हिंदुस्तान युनिलिव्हर, नेस्ले इंडिया, अॅक्सिस बँक, लार्सन अॅण्ड टुब्रो आणि टीसीएस कमी बंद झाले.
का आली तेजी?
जागतिक बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात सकारात्मक कल दिसून येत असताना आयटी, ग्राहकोपयोगी वस्तू आणि कमोडिटी समभागांमध्ये जोरदार खरेदीमुळे देशांतर्गत शेअर बाजार वाढल्याचे दिसून आले.
जागतिक बाजारपेठेंची काय स्थिती ?
आशियाई बाजारपेठेत, टोकियो आणि शांघाय वर बंद झाले तर हाँगकाँग आणि सोल खाली बंद झाले. गुरुवारी मध्य सत्रादरम्यान युरोपियन बाजारपेठा जास्त व्यापार करत होत्या. बुधवारी अमेरिकन शेअर बाजार जास्त बंद झाला. या अगोदरच्या दिवशी म्हणजे बुधवारी बेंचमार्क शेअरबाजार निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी बुधवारी दिवसभर जास्त बंद झाले. एचडीएफसी बँकेच्या तिसऱ्या तिमाहीच्या आकडेवारीमुळे खासगी बँकांच्या समभागांमध्ये वाढ झाली. यासोबतच, बाजाराला वाढत्या आयटी क्षेत्रातील कामगिरीचाही आधार मिळाला होता.
समभाग वधारलेल्या कंपन्या
- अल्ट्राटेक सिमेंट 11422
- झोमॅटो 221
- महिंद्रा-महिंद्रा 2885
- सनफार्मा 1834
- टेक महिंद्रा 1714
- टाटा मोटर्स 752
- टायटन 3396
- टाटा स्टील 130
- आयटीसी 440
- बजाज फायनान्स 7439
- एशियन पेन्ट्स 2276
- इन्फोसिस 1864
- भारती एअरटेल 1638
- एनटीपीसी 323
- आयसीआयसीआय 1203
- मारुती सुझुकी 12046
- अदानी पोर्ट 1103
- बजाज फिनसर्व्ह 1745
- सिमेन्स 6065
- ग्रासिम 2460
- विप्रो 317
- मॅक्स हेल्थकेअर 1083
- ब्रिटानिया 5011
- हिरोमोटो 4100
- टीव्हीएस मोटार 2292
- सिप्ला 1449
- डाबर इंडिया 524
- ल्यूपिन 2152
समभाग घसरलेल्या कंपन्या
- पॉवरग्रिड कॉर्प 294
- एचसीएल टेक 1807
- कोटक महिंद्रा 1894
- रिलायन्स इंडस्ट्रीज 1263
- स्टेट बँक 745
- हिंदुस्थान युनि 2322
- अॅक्सिस बँक 951
- नेस्ले 2197
- लार्सन अॅण्ड टुब्रो 3503
- टीसीएस 4143
- इंडसइंड बँक 970
- एचडीएफसी बँक 1664
- कोलगेट 2742